विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीच्या दारू घोटाळ्यात तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जाला सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ED ने विरोध केला. त्याचवेळी संपूर्ण आम आदमी पार्टीवरच लवकरच आरोपपत्र दाखल करणार असल्याचे ED च्या वकिलांनी विशेष न्यायालयात स्पष्ट केले.Arvind Kejriwal News Live Updates: ‘AAP will also be made accused in case and supplementary chargesheet will be filed very soon’, ED tells Delhi high court
मनीष सिसोदिया यांना आम आदमी पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारक नेमले आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत त्यांचे नाव घालून ती यादी आम आदमी पार्टीने निवडणूक आयोगाला पाठवली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणूक प्रचारासाठी जर जामीन मिळू शकतो, तर तो सिसोदिया यांना देखील मिळू शकतो, असा दावा करून आम आदमी पार्टीने सिसोदियांचे नाव परस्पर स्टार प्रचारकांच्या यादीत घातले. परंतु विशेष न्यायालयाने सिसोदिया यांच्या जामीन अर्जावरचा निर्णय राखून ठेवला.
तत्पूर्वी ED ने सिसोदिया यांच्या विरोध केला. त्याचवेळी त्यांनी आम आदमी पार्टीवरच आरोप पत्र दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले. दिल्लीच्या दारू घोटाळ्यातला सगळा पैसा आम आदमी पार्टीने गोवा विधानसभा निवडणुकीत वापरला. त्याचे सगळे पुरावे ED मिळाले असा युक्तिवाद ED च्या वकिलांनी केला. एखाद्या आर्थिक घोटाळ्यात केवळ व्यक्ती किंवा व्यक्ती समूह नव्हे, तर संपूर्ण राजकीय पक्षच आरोपी ठरण्याची ही पहिलीच वेळ आहे. आम आदमी पार्टीला तो “सन्मान” प्राप्त झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App