वृत्तसंस्था
मुंबई : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल चमत्कार झाला. अफगाणिस्तान सारख्या नवख्या टीम विरुद्ध पूर्णपणे हरत चाललेल्या ऑस्ट्रेलिया टीमला ग्लेन मॅक्सवेलने आपल्या दिशतकाच्या बळावर विजय मिळवून दिला भारताचा “विक्रमादित्य” कपिलदेवचा वर्ल्ड रेकॉर्ड ग्लेन मॅक्सवेलने मोडला. त्यामुळे सगळीकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. पण या कौतुकाच्या वर्षातच भारताचा दुसरा “विक्रमादित्य” वीरेंद्र सेहवाग याचे एक ट्विट व्हायरल झाले आहे.Appreciation of Maxwell OK but…; Veeru’s tweet telling the “secret” of Australia’s victory went viral
मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाला जिंकून दिले हे खरेच, पण दुसऱ्या बाजूला उभा असलेला खेळाडू कर्णधार पॅट कमिन्स याचा देखील या विजयात सिंहाचा वाटा होता. त्याकडे दुर्लक्ष नको असे ट्विट वीरूने केले आहे.
या सामन्यामध्ये इब्राहिम जादरान याच्या 129 धावांच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलिया संघापुढे 292 धावांचे आव्हान उभे केले होते. ऑस्ट्रेलिया संघाच्या एकवेळ 91 धावांत 7 विकेट गेल्या असताना तिथून 292 धावा चेस करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्याबाबत बोलताना माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग याने विजयामध्ये गेमचेंझर ठरलेल्या मॅक्सवेलचाच नाहीतर दुसऱ्या खेळाडूचाही विजयात सिंहाचा वाटा असल्याचं म्हटलं आहे.
काय म्हणाला सेहवाग?
लक्ष्याचा पाठलाग करताना मॅक्सवेलचं द्विशतक हे वन डे क्रिकेटमधील सर्वकालीन महान खेळीपैकी एक आहे. अनेक दिवस ते लक्षात राहिल, त्याला कर्णधार पॅट कमिन्सनेही महत्त्वाची साथ दिल्याचं विरेंद्र सेहवागने म्हटलं आहे. सेहवागने यासंदर्भात ट्विट केलं आहे. मॅक्सवेलने सामना जिंकवला असला तरी दुसरीकडून त्याला पॅट कमिन्सने त्याला चांगली साथ दिली. तब्बल 68 बॉल खेळले आणि अवघ्या 12 धावा जरी त्याने केल्या असल्या तरी तो मैदानावर एका बाजूला उभा होता हे महत्त्वाचं होतं. कारण बॉल डॉट गेले तरी हिटिंगने मॅक्सवेल त्याचं काम करत होता.
सेहवागचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीसुद्धा पॅट कमिन्सचं विशेष कौतुक केलं आहे. कारण मॅक्सवेलला कोणत्याच मुख्य फलंदाजाने साथ दिली नाही. कांगारूंच्या एकालाही 30 धावा करता आल्या नाहीत.
अफगाणिस्तान प्लेईंग 11 :
हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद आणि नवीन-उल-हक.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग 11 :
पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, अॅडम
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App