विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने (भाजप) पाच पैकी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर आज (शुक्रवारी) तीन राज्यांसाठी निरीक्षकांची नावे जाहीर केली आहेत. या विजयी राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी भाजपने तीन केंद्रीय मंत्र्यांसह नऊ निरीक्षकांची घोषणा केली आहे.Appointment of observers by BJP for Chief Minister election of Madhya Pradesh, Chhattisgarh and Rajasthan
पक्षाने जारी केलेल्या निवेदनानुसार, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि राज्यसभा खासदार सरोज पांडे यांची राजस्थानमधील विधीमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवडीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
यासोबतच मध्य प्रदेशसाठी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, पक्षाच्या संसदीय मंडळाचे सदस्य के. लक्ष्मण आणि राष्ट्रीय सचिव आशा लाक्रा यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे,
तर केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा आणि सर्बानंद सोनोवाल आणि पक्षाचे सरचिटणीस दुष्यंत कुमार गौतम यांची छत्तीसगडमधील विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत. या निवडणुकांमध्ये पक्षाने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केला नव्हता.या तीन राज्यांतील मुख्यमंत्र्यांची नावे अद्याप ठरलेली नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या नावावर विचारमंथन सुरू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App