विशेष प्रतिनिधी
मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी लोकसभेच्या आचार समितीचा अहवाल आज सभागृहात मांडण्यात आला. भाजप खासदार विजय सोनकर यांनी हा अहवाल लोकसभेत मांडला. सुमारे अर्धा तास चाललेल्या चर्चेनंतर लोकसभेने तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांची हकालपट्टी करण्याची शिफारस करणाऱ्या आचार समितीच्या अहवालाला मंजुरी दिली.Cash For Query Mahua Moitras membership of Parliament canceled, Ethics Committee report approved in Lok Sabha
महुआ मोइत्रा यांची हकालपट्टी करण्याच्या संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रस्तावाला सभागृहाने मंजुरी दिली. म्हणजे Cash For Query प्रकरणी महुआ यांचे संसद सदस्यत्व तत्काळ रद्द करण्यात आले आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आचार समितीचा अहवाल अजेंड्यात समाविष्ट करण्यात आला होता, मात्र तो मांडण्यात आला नाही, हे विशेष. लोकसभेच्या सचिवालयाने शुक्रवारी जारी केलेल्या सुधारित यादीमध्ये नीतिशास्त्र समितीचा अहवाल अजेंडा आयटम क्रमांक 7 म्हणून सूचीबद्ध करण्यात आला.
दुसरीकडे, अहवालाचे सादरीकरण आणि मतविभाजनाची विरोधकांची मागणी पाहता भाजपने व्हीप जारी करून आपल्या खासदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more