
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताच्या सैन्य दलांचे प्रमुख अर्थात नवे सीडीएस नेमण्याच्या आता वेगवान हालचाली केंद्रीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेतील निधनानंतर फार काळ सीडीएस हे सैन्य दलाचे सर्वोच्च पद रिक्त ठेवता येणार नाही. त्यामुळेच या पदावर सैन्य दलातील वरिष्ठ व्यक्तीला नेण्याच्या हालचाली सुरू झाले आहेत. Appointment of new CDS soon as per recommendations of high power committee of three services
त्याची एक विशिष्ट प्रक्रिया आहे. तिन्ही सैन्य दलांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती सरकारने नेमेल. तीन दिवसांमध्ये ही समिती नव्या सीडीएसचे नाव असलेली शिफारस संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे करेल. राजनाथ सिंग हे कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी अफेअर्स अर्थात पंतप्रधानांच्या नेतृत्वतील सर्वोच्च समिती यापुढे या नावाची शिफारस ठेवतील आणि केंद्र सरकार नवीन सीडीएसची घोषणा करू शकेल.
लष्करातील सध्याची व्यवस्था पाहतात लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंड नरवणे हे सर्वात वरिष्ठ आणि ज्येष्ठ अधिकारी आहेत. एप्रिल 2022 मध्ये ते निवृत्त होत आहेत. त्याआधी त्यांची सीडीएस पदावर नियुक्ती झाली तर ते उचित ठरेल, असे मत सैन्य दलाच्या अनेक माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. जनरल नरवणे यांची नियुक्ती जर सीडीएस पदावर झाली तर लगेच नवे लष्करप्रमुख सरकारला नेमावे लागतील. लष्कराच्या दक्षिण, पूर्व आणि पश्चिम कमांडच्या प्रमुख पदावरील एक अधिकारी नवे लष्करप्रमुख होऊ शकतील.
अर्थात हा निर्णय सर्वस्वी केंद्र सरकारवर अवलंबून आहे. केंद्र सरकार कोणता धोरणात्मक निर्णय घेते यावर नवीन सीडीएस पदाची नियुक्ती ठरू शकेल. परंतु, या प्रक्रियेला लवकर पूर्ण करावे लागेल. कारण सीडीएस हे पद फार काळ रिक्त ठेवता येणार नाही, असे मतही निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
Appointment of new CDS soon as per recommendations of high power committee of three services
महत्त्वाच्या बातम्या
- Watch : ‘माझे वडील माझे हीरो होते, कदाचित तेच नशिबात असेल,’ ब्रिगेडियर एलएस लिड्डर यांची कन्या आशनाने साश्रुनयनांनी दिला निरोप
- ‘एक दिवस ऊसतोड मजुरांसोबत’ : गोपीनाथ मुंडे जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंचा अनोखा संकल्प, कार्यकर्त्यांनाही केले भावनिक आवाहन
- ब्रिगेडियर लिड्डर अंतिम निरोप; वीर पत्नी आणि वीर कन्याच शूर वीराला असा धीरोदात्त निरोप देऊ शकतात…!!
- Gen Bipin Rawat Last Rites Live Updates : अमित शाह, राहुल गांधींनी CDS बिपिन रावत यांना वाहिली श्रद्धांजली, दुपारी 2 वाजता निघणार अंत्ययात्रा
- दिल्लीत ब्रिगेडियर लिड्डर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, कन्येने दिला मुखाग्नि; राजनाथ सिंह देखील होते उपस्थित