अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींवर साधला निशाणा
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बांगलादेशातील हिंसाचाराचा मुद्दा शुक्रवारी लोकसभेतही उपस्थित करण्यात आला. भाजप खासदार अनुराग ठाकूर ( Anurag Thakur )यांनी राहुल गांधींवर ( Rahul Gandhi )निशाणा साधला. ते म्हणाले की काँग्रेस अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्विट करून बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या नवीन पंतप्रधानांचे अभिनंदन केले. पण हिंदूंवरील हिंसाचाराचा उल्लेख केला नाही. ठाकूर म्हणाले की, गाझाबाबत मोठ्या गप्पा मारल्या गेल्या… पण बांगलादेशवर काय मजबुरी आहे?
अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत सांगितले की, आपल्या शेजारील बांगलादेशात नुकतेच जे काही घडले आहे त्यामुळे आपण सर्वजण चिंतेत आहोत. तिथे राहणाऱ्या आपल्या लोकांची काळजी करायला हवी, असे सर्वच राजकीय पक्षांनी एका आवाजात म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून अंतरिम सरकारच्या पंतप्रधानांचे अभिनंदन केले. मात्र तेथे हिंदू आणि अल्पसंख्याकांचा शांतता, सुरक्षा आणि विकास सुनिश्चित केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
अनुराग पुढे म्हणाले की, दुर्दैवाने विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस प्रमुखांनी ट्विट करून त्यांचे अभिनंदन केले, तेव्हा त्यांनी तेथील हिंदूंबद्दल काहीही सांगितले नाही. अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत ते काहीही बोलले नाहीत. तिथल्या हिंदूंच्या आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबद्दल ते बोलू शकले नाही अशी कोणती मजबूरी होती? असा सवालही केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more