‘INDIA’ आघाडीला आणखी एक धक्का; मध्यप्रदेशात विधानसभेसाठी ‘JDU’ने उमेदवारांची यादी केली जाहीर


आधी समाजवादी पक्षाने काँग्रेसविरोधात बंडखोरी दाखवली आणि आता या आघाडीला जेडीयूने दणका दिला आहे.

विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वीच ‘INDIA’ आघाडीत भांडणं पाहायला मिळत आहे. आधी समाजवादी पक्षाने काँग्रेसविरोधात बंडखोरी दाखवली आणि आता या आघाडीला जेडीयूने दणका दिला आहे. जेडीयूने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. जेडीयूच्या पाच उमेदवारांची नावे पहिल्या यादीत आहेत. Another blow to the INDIA front JDU has announced the list of candidates for the Legislative Assembly in Madhya Pradesh

जेडीयूने जाहीर केलेल्या पाच उमेदवारांमध्ये पिचोरे विधानसभा मतदारसंघातून चंद्रपाल यादव, राजनगरमधून रामकुंवर (राणी) रायकवार, विजय राघवगढ जागेवरून शिवनारायण सोनी, थांडला विधानसभा मतदारसंघातून तोलसिंग भुरिया आणि पेटलावाड येथून रामेश्वर सिंगर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पक्षाने यादी जाहीर केल्यानंतर लगेचच, बिहारच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे की ‘INDIA’ आघाडी आत्मघाती मोडमध्ये आली आहे. बिहारच्या महाआघाडीत सर्व काही ठीक चालले नाही,हेही दिसत आहे. काँग्रेस आणि राजद हे दोन्ही पक्ष बिहार सरकारमध्ये दोन अतिरिक्त मंत्र्यांच्या नियुक्तीची वाट पाहत आहेत.

Another blow to the INDIA front JDU has announced the list of candidates for the Legislative Assembly in Madhya Pradesh

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात