Anna Hazare : नेते समाज आणि देशाला विसरून पैशाच्या मागे लागले; अण्णा हजारेंची संतप्त प्रतिक्रिया; राघव चढ्ढांसह 7 खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश

Anna Hazare

विशेष प्रतिनिधी

अहिल्यानगर : Anna Hazare  देशाच्या राजकारणात आज एका मोठ्या राजकीय भूकंपाची नोंद झाली असून, ‘आम आदमी पक्षा’चे खासदार राघव चढ्ढा यांनी इतर 7 खासदारांसह अनपेक्षितपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशापूर्वी राघव चढ्ढा यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यसभेतील ‘आप’च्या गटाचे भाजपमध्ये विलीनीकरण करत असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या धक्कादायक फुटीवर पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली असतानाच, ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी देखील या घटनेचा कडक शब्दांत निषेध केला आहे.Anna Hazare

अण्णा हजारे म्हणाले, पक्ष टिकवण्यासाठी, एकत्र राहण्यासाठी संसदेत कायदा होणे गरजेचे आहे. आपल्या मर्जीप्रमाणे कोणीही पक्ष बदलणार नाही. सत्ता आणि पैसा यांच्या लालचमध्ये येताच इकडून तिकडे आणि तिकडून इकडे पक्षांतर होते. त्यामुळे, मनमर्जीप्रमाणे सत्ताबलदाचे काम होतात हे बरोबर नाही, असे म्हणत हजारे यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.Anna Hazare



पुढे बोलताना अण्णा हजारे म्हणाले, आंदोलनातून आम आदमी पक्षाचा उदय झाला, पण आता ओकक्ष फुटत आहे. स्वार्थ आल्यानंतर लोक सोडून जातात, समाज आणि देश डोळ्यासमोर ठेऊन काम केल्यास कोणीही जाणार नाही. आज समाज आणि देशाला विसरून नेते सत्ता आणि पैशाच्या पाठीमागे लागत आहेत. म्हणून लोकांनी निवडून देताना चारित्र्यशील लोक निवडून दिले पाहिजे. हे जे चालले आहे ते स्वार्थासाठी चालले आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, आज समाज आणि देश डोळ्यासमोर राहिलेला नाही.

दरम्यान, राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी ‘आम आदमी पक्षा’चा अधिकृत राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला असून, त्यांच्यासोबत पक्षांतर करणाऱ्या इतर सात जणांची नावेही त्यांनी जाहीर केली आहेत. यामध्ये सर्वात धक्कादायक नाव म्हणजे अशोक मित्तल यांचे असून, चड्ढा यांच्या हकालपट्टीनंतर अवघ्या 15 दिवसांपूर्वीच त्यांची राज्यसभेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. विशेष म्हणजे, अवघ्या 10 दिवसांपूर्वीच मित्तल यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने छापेमारी केली होती, त्यानंतर आता त्यांनी थेट भाजपची वाट धरल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

Leaders Running After Money”: Anna Hazare Slams Raghav Chadha and 7 MPs’ Exit

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात