विशेष प्रतिनिधी
रांची : झारखंडमधील तरुणाला अॅमेझॉन बर्लिन कंपनीने तब्बल १.१५ कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. हा तरुण कोडींगमध्ये मास्टर मानला जातो. सॉफ्टवअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून तो काम करतो. शुभम राज याची कंपनीमध्ये सॉफ्टवअर डेव्हलपर इंजिनिअर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शुभम राज याचा कोडिंगमध्ये हातखंडा आहे.Amazon Berlin Company has given 1.15 crore rupees package to Zarkhand youth
या तरुणावर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याच्या कुटुंबीयांनी पेढे वाटून हा आनंद साजरा केलाय. शुभम बद्दल अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे. यापूर्वी देखील शुभम राज याला अनेक कंपन्यांकडून जॉबची ऑफर आली आहे.
2021 मध्ये शुभम राज यांची निवड जागतिक स्तरावरील स्पर्धा असलेल्या गूगल समर ऑफ कोड साठी देखील झाली होती. या नंतर आपल्या करीअरचा मार्ग अधिक सोपा झाल्याची माहिती शुभम राज याने दिली.शुभम यांने रांचीमध्येच 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
सुरुवातीपासूनच हुशार असलेल्या शुभम राज याला त्यानंतर आयआयटीला प्रवेश मिळाला. शुभम सध्या आयआयटी आगरतळामध्ये शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो अॅमझॉनसाठी बर्लिनमध्ये काम करणार आहे.
त्याने अकरावीत असल्यापासूनच कोडिंगचा अभ्यास सुरू केला होता. सुरुवातीपासूनच कोडिंगची आवड होती. या क्षेत्रात करीअर करण्याचा निर्णय घेतला होता. आज मला यश मिळाले असल्याचे शुभम राज याने सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App