कोथरुडचे किती प्रश्न चंद्रकांत पाटलांनी मांडले? प्रशांत जगताप यांचा प्रश्न


विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे महापालिकेत सत्ता आहे भाजपची. चंद्रकांत पाटील आहेत पूर्णपणे पुणे शहरातच असणाऱ्या कोथरुड मतदारसंघाचे. महापौर मुरलीधर मोहोळ कोथरुडमधूनच नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. पुण्याच्या जनतेने मोठ्या विश्वासाने त्यांच्याकडे सत्ता दिली. How many questions of Kothrud were asked by Chandrakant Patil?Question by Prashant Jagtap

असे असतानाही, कोथरुडचे प्रतिनिधित्व करत असलेल्या चंद्रकांत पाटील यांना त्याच भागात राहणाऱ्या महापौरांकडून अपेक्षित कामे करून घेता येत नाहीत, यात अपयश कोणाचे? असा प्रश्न पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी उपस्थित केला.जिल्ह्याच्या आढावा बैठकीमध्ये आमच्या लोकांच्या प्रश्नांना स्थान नाही. आमच्या प्रस्तावांना केराची टोपली दाखवली जाते, असे विधान कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. मात्र, आढावा बैठक असो किंवा कोणतीही चर्चा, एखाद्या प्रश्नावर तत्काळ उत्तर मिळणार,

असा राज्यातील आघाडीचा नेता म्हणजे अजित पवार. चंद्रकांत पाटील यांनाही कदाचित महापालिकेऐवजी पवारांकडून जास्त अपेक्षा असाव्यात, हेच स्पष्ट होते. कोणतेही काम योग्य असेल, नियमांच्या चौकटीत होण्यासारखे असेल, पवार कोणताही मुलाहिजा न ठेवता, कोणताही विचार न करता त्याला मंजुरी देतात.काम होण्यासारखे नसेल, तर काम होणार नाही, या स्पष्ट शब्दांमध्ये सांगतात, ही गोष्ट सर्व राज्याला माहीत आहे. मात्र, चंद्रकांत पाटील नुसती दिशाभूल करत आहेत, हे स्पष्ट आहे, असे जगताप यांनी म्हटले आहे.

जगताप म्हणतात, राहता राहिला प्रश्न आढावा बैठकींचा, तर गेल्या दोन वर्षांमध्ये चंद्रकांत पाटील किती काळामध्ये आढावा बैठकींना हजर राहिले आणि कोथरुडचे किती प्रश्न त्यांनी मांडले, याचा त्यांनीच विचार करावा. तब्बल दोन वर्षे या बैठकांना गैरहजरी लावून, आता हेच आमदार पवार प्रश्न मार्गी लावत नाहीत, अशी तक्रार करत आहेत, यातून त्यांना काय साध्य करायचे आहे, त्यांनाच माहीत.

How many questions of Kothrud were asked by Chandrakant Patil?Question by Prashant Jagtap

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*