विशेष प्रतिनिधी
मुंबई : महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा यांचे नाते पुन्हा जुळविण्यासाठी ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी आणि समाजवादी पक्षाचे नेते अमर सिंह यांनी पर्यत केले होते. मात्र हे नाते जुळू शकले नाही.Amar Singh and Hema Malini tried to reconcile the Rekha-Amitabh relationship
लेखक यासिर उस्मान लिखित रेखा या पुस्तकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. हेमा मालिनी आणि रेखा या दोघीही अतिशय चांगल्या मैत्रिणी आहेत. अनेकदा त्य़ांना एकत्रही पाहिलं गेलं आहे. अमिताभ बच्चन यांच्याशीही हेमा यांची चांगली मैत्री आहे.
मैत्रीच्या याच नात्याखातर हेमा मालिनी या रेखा आणि बिग बी यांची भेट घालण्यास तयार झाल्या होत्या. या साऱ्यासाठी त्यांनी एका राजकीय नेत्याची मदत घेतली होती. हेमा मालिनी यांनी रेखा आणि अमिताभ बच्चन यांचं नातं रुळावर आणण्यासाठी अमर सिंह यांची मदत घेतली होती. अमिताभ हे सिंह यांचे चांगले मित्र होते, ज्यामुळे त्यांनी या नात्यासाठी हा एक प्रयत्न केला होता.
रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन यांच्यातील कटू सबंधाविषयी नेहमी बोलले जाते. अमिताभ यांचा कुली सिनेमाच्या शुटिंगवेळी अपघात झाला.त्यावेळी रेखा यांना त्यांची भेट जया बच्चन यांनी घेऊन दिली नाही. एका सकाळी भेटीसाठी आलेल्या रेखा यांना काचेतूनच अमिताभ यांना पाहावे लागले.
मात्र आपल्या स्ट्रगलच्या काळात रेखा आणि जया बच्चन चांगल्या मैत्रिणी होत्या. एवढेच नव्हे तर त्या दोघी एकाच अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. मात्र जंजीर चित्रपटाच्या यशानंतर जया यांनी अमिताभ यांच्याशी विवाह केला.त्याला रेखा यांना बोलावले नाही. मात्र मुकदर का सिकंदर चित्रपटाच्या वेळी रेखा आणि अमिताभ प्रेमात पडले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App