हिंदूधर्मीयांसाठी अत्यंत पवित्र मानली जाणारी चार धाम यात्रा रेल्वेने करणेही शक्य होणार आहे. चार धाम प्रकल्पासाठी शेवटच्या टप्यापर्यंत जोडण्यात येणाºया योजनेची पाहणी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केली.All the four dhams will be connected by rail, Presentation to Railway Minister Piyush Goyal
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हिंदूधर्मीयांसाठी अत्यंत पवित्र मानली जाणारी चार धाम यात्रा रेल्वेने करणेही शक्य होणार आहे. चार धाम प्रकल्पासाठी शेवटच्या टप्यापर्यंत जोडण्यात येणाºया योजनेची पाहणी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केली.
पावसाळ्याच्या काळात चार धाम यात्रेच्या काळात होणारे अपघात आणि अचानक निर्माण होणारे नैसर्गिक संकट या पृष्ठभूमीवर भाविकांना थेट चार धाम यात्रेचे पवित्र ठिकाण असलेल्या यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथच्या ठिकाणी पोहोचता यावे,
यासाठी पीयूष गोयल यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या प्रकल्पाचा आढावा घेणाºया बैठकीत गोयल यांच्यापुढे रेल्वे अधिकाºयांनी योजनेचे सादरीकरण केले. रेल्वे मंत्री गोयल यांनी या योजनेची घोषणा गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये केली होती.
बैठकीत गोयल यांनी अधिकाºयांना प्रवाशांची सुरक्षा आणि आरामाच्या दृष्टीने सर्व पयार्यांबाबत सविस्तर आढावा घेण्याचे निर्देश दिले. शेवटच्या टप्प्यापर्यंत कनेक्टिव्हिटीचे सर्व पर्याय तपासले जावे आणि प्रकल्प पूर्ण होईपर्यंत संपूर्ण खर्चाच्या परिणामाचीही तपासणी केली पाहिजे.
चार धाम यात्रेसाठी भाविकांना त्वरित, सुरक्षित आणि सोयीस्कर कनेक्टिव्हिटी मिळावी, अशा सूचना गोयल यांनी बैठकीत दिल्या.केदारनाथ आणि बद्रीनाथमधील रेल्वे कनेक्टिव्हिटी कर्णप्रयाग स्थानकातून सुरू होईल.
हा मार्ग 125 किमी लांब असून, ऋषिकेश-कर्णप्रयाग या नव्या रेल्वेमार्ग प्रकल्पाचा तो भाग आहे. गंगोत्री आणि यमुनोत्री रेल्वे कनेक्टिव्हिटी सध्याच्या डोईवाला स्थानकावरून सुरू होईल. भाविकांना चारही धामांपर्यंत सुरक्षित आणि आरामदायक पद्धतीने पोहोचविण्याचे लक्ष्य रेल्वेने ठेवले आहे.
त्याच अनुषंगाने भारतीय रेल्वे 327 किलोमीटरच्या मार्गा अंतर्गत उत्तराखंडमध्ये चारही धामांना जोडण्यासाठी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करीत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भाविकांची चार धाम यात्रा अधिक सुलभ होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App