इलेक्टोरल बाँड्सशी संबंधित सर्व डेटा SBIकडून निवडणूक आयोगाकडे सुपूर्द!

SBIने सर्वोच्च न्यायालयात दिले हे उत्तर, जाणून घ्या आणखी काय सांगतिलं.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने निवडणूक रोख्यांशी संबंधित सर्व डेटा निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केला आहे. एसबीआयने आज सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती दिली.All data related to electoral bonds SBI handed over to Election Commission



एसबीआयने सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आमच्या बाजूचा सर्व डेटा निवडणूक आयोगाला देण्यात आला आहे. आज सुप्रीम कोर्टात SBI ने इलेक्ट्रोल बाँडशी संबंधित सर्व डेटा निवडणूक आयोगाला दिल्याची माहिती दिली. SBI चे चेअरमन दिनेश कुमार खारा यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले आहे की कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही इलेक्ट्रोल बॉन्डशी संबंधित सर्व माहिती निर्धारित मुदतीपूर्वी म्हणजेच 21 मार्च संध्याकाळी 5 वाजता दिली आहे.

या माहितीमध्ये बाँडचा अल्फा न्युमेरिक नंबर, म्हणजे अनन्य क्रमांक, बाँडची किंमत, खरेदीदाराचे नाव, पेमेंट प्राप्त करणाऱ्या पक्षाचे नाव, पक्षाच्या बँक खाते क्रमांकाचे शेवटचे चार अंक, भरलेल्या बाँडचे मूल्य/संख्या यांचा समावेश होतो. तथापि, सायबर सुरक्षा लक्षात घेऊन, रोखे खरेदी करणाऱ्या आणि जारी करणाऱ्यांचे बँक तपशील आणि केवायसी माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही.

स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले केले की सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही प्रत्येक तपशील सामायिक करू शकत नाही, परंतु इतकी माहिती सामायिक केली गेली आहे की कोणालाही गोंधळ होणार नाही.

All data related to electoral bonds SBI handed over to Election Commission

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात