नाशिक : एकीकडे काँग्रेसची दादागिरी, दुसरीकडे समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांची PDA फॉर्म्युलाची तयारी या कात्रीत “उत्साही” ठाकरे + पवार सापडले आहेत. Akhilesh yadav’s PDA formula political headache for pawar, Congress and thackeray
लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेला थोपवून ठाकरे – पवारांनी महाराष्ट्रात ताकद दाखवून महाविकास आघाडीचे तब्बल 31 खासदार निवडून आणले. पण या यशात काँग्रेसची मोठी माशी शिंकली. कारण सांगलीच्या विशाल पाटलांसह काँग्रेसचे 14 खासदार जिंकले आणि ठाकरे + पवारांचे पक्ष अनुक्रमे 9 आणि 8 जागा मिळवून सिंगल डिजिटच उरले. महाराष्ट्रात मोदींना हलविण्याचे क्रेडिट मराठी माध्यमांनी ठाकरे + पवारांना दिले. पण म्हणून काँग्रेसचे क्रेडिट त्यांना हिरावून घेता आले नाही.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक झाली. त्यात महाराष्ट्रात काँग्रेस नंबर 1 चा पक्ष नसल्याने विधानसभेच्या सर्वाधिक जागा महाविकास आघाडीत खेचून घेण्याचा निर्णय झाला. याचा ठाकरे + पवारांना धक्का बसला. महाविकास आघाडीवर आपले नियंत्रण ठेवण्यासाठी काँग्रेसला आपल्या अंगठ्याखाली ठेवायचा पवारांचा इरादा होता. पण तो काँग्रेसने उधळून लावला. मुंबईत ठाकरे यांच्या शिवसेनेला वर्चस्व राखण्यासाठी 36 पैकी 25 जागांवर लढायचे आहे, पण काँग्रेस नेते ऐकायच्या मूड मध्ये नाहीत.
त्यामुळे पवारांनी आखलेल्या प्लॅन बी नुसार महाविकास आघाडी तोडून ठाकरे + पवारांची आघाडी आणि काँग्रेस स्वतंत्र अशी निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. यात ठाकरे + पवारांचे पक्ष तोट्यात जाण्याची शक्यता आहे. कारण मोदींना हलविण्याचे क्रेडिट मराठी माध्यमांनी ठाकरे + पवार यांच्या गळ्यात घालणे निराळे आणि प्रत्यक्षात जनतेची मते मिळवून प्रथम क्रमांकाचा पक्ष बनणे निराळे. महाविकास आघाडीत काँग्रेस जनतेच्या मतांच्या बळावर पहिल्या नंबरचा पक्ष बनला आहे. त्यामुळे काँग्रेसला जास्त जागा देणे आणि आपण दुय्यम, तिय्यम भूमिका घेणे ठाकरे + पवारांना भाग आहे. अन्यथा महाविकास आघाडीत मोठी फाटाफूट अटळ आहे.
अखिलेश यादवांचा PDA फॉर्म्युला
पण पवार आणि ठाकरे यांना फक्त काँग्रेसचीच डोकेदुखी नाही, तर आता अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीच्या महाराष्ट्रातल्या एंट्रीची देखील डोकेदुखी होणार आहे. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीच्या 25 खासदारांचा सत्कार अबू आजमी यांनी मुंबईत आणून केला. अखिलेश आता मुंबई, ठाणे, विदर्भ, मराठवाड्यात शेलक्या जागांवर उमेदवार उभे करून तिथे पिछडा, दलित, आदिवासी अर्थात PDA फॉर्म्युला राबविणार आहेत. म्हणजेच ते पवार आणि ठाकरे तसेच काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीवर डल्ला मारणार आहेत. ठाकरे, पवार किंवा काँग्रेसचे 31 खासदार निवडून आले असले तरी प्रत्येकाचे मार्जिन काही एवढे मोठे नाही, की त्या मार्जिनवर हिशेब लावून विधानसभेतली गणिते पक्की करावीत. उलट अखिलेश यांनी खरंच समाजवादी पार्टीचे उमेदवार उभे केले आणि त्यांचा उत्तर प्रदेश मधला PDA फॉर्म्युला महाराष्ट्रात राबविला, तर ठाकरे + पवार आणि काँग्रेस यांचे मार्जिन धाडकन कोसळणार आहे. त्यातच नेहमीप्रमाणे रिपब्लिकन ऐक्यच्या बाताही सुरू आहेत. त्यामुळे ठाकरे + पवार आणि काँग्रेस यांना आपले आहे ते मार्जिन टिकवून मते घेण्यासाठी त्यामध्ये कुठलीही कुठलाही वाटेकरी नको आहे. कुठलाही वाटेकरी थोडी जरी मते घेऊन गेला तरी ठाकरे + पवार आणि काँग्रेसचे सगळे गणित कोसळणार आहे. कारण महायुतीशी मतांच्या टक्केवारीबाबत खरंच काट्याची टक्कर आहे.
त्यामुळे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत 31 खासदारांचा विजय मिळवूनही प्रचंड “उत्साहात” आलेले ठाकरे + पवार खऱ्या अर्थाने एकीकडे काँग्रेसची दादागिरी आणि दुसरीकडे अखिलेश यादव यांची PDA फॉर्मुल्याची तयारी या कात्रीत अडकले आहेत. या कात्रीतून सुटण्यासाठी ठाकरे आणि पवारांना तसेच काँग्रेसला अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीला महाविकास आघाडीत सामावून घेणे भाग आहे… पण जागावाटपाच्या टेबलावर खरी कसोटी आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App