वृत्तसंस्था
लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभेच्या फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपसमोर कडवे आव्हान उभे करून 400 जागा जिंकण्याच्या बाता करणाऱ्या अखिलेश यादव यांनी स्वतः निवडणुकीतून माघार घेतली आहे. ते आजमगड मधून सध्या लोकसभेचे खासदार आहेत. त्यामुळे ते विधानसभेची निवडणूक लढवणार नाहीत, असे त्यांनी जाहीर केले आहे.Akhilesh Yadav out of Uttar Pradesh Assembly polls; Fear of defeat or “successful withdrawal
समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या अखिलेश यादव यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतल्याने ही पराभवाची भीती आहे? की “यशस्वी माघार” आहे!!,याची चर्चा उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला बहुमत मिळाले नाही, तर विरोधी बाकांवर बसून अखिलेश यादव यांना विरोधी पक्षनेते पदावर समाधान मानावे लागेल. ही राजकीय कुचंबणा होऊ नये म्हणून त्यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
परंतु आपण आजमगड मधून खासदार असल्याने विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याचे अखिलेश यादव यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे युद्धात जशी “यशस्वी माघार” असते, तशी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीतून अखिलेश यादव यांनी “यशस्वी माघार” घेतल्याचे समाजवादी पक्षाचे समर्थक सांगतात.
जे अखिलेश यादव यांचे तेच प्रियांका गांधी यांचे प्रियांका गांधी स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरतील का? या प्रश्नाची देखील या निमित्ताने चर्चा होत आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा चेहरा म्हणून प्रियांका गांधी यांना पुढे करावे, अशी सूचना मध्यंतरी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केली होती. परंतु काँग्रेसने ती सूचना फेटाळून लावली आहे.
प्रियांका गांधी यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा करणे हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मान्य नसल्याचे सांगण्यात येते. यामागे देखील भाजपसमोर आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर प्रियांका गांधी यांचा चेहरा पुढे करून निवडणूक लढविली आणि काँग्रेसचा पराभव झाला तर त्याचे खापर प्रियांका गांधी यांच्यावरच फुटू शकते आणि नेमके हेच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना अडचणीचे ठरू शकते.
त्यामुळेच प्रियांका गांधी या जरी आघाडीवर राहून काँग्रेसचा प्रचार करत असलेया तरी त्यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढविण्यास काँग्रेसचे नेते तयार नसल्याचे दिसते. अशा स्थितीत अखिलेश यादव यांची माघार म्हणजे एक प्रकारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिलेली “पुढे चाल” आहे का?, अशीही कुजबूज उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more