कोणत्याही कर्णधाराच्या तोंडातून असं वक्तव्य येणं अपेक्षित नाही – कपिल यांचा विराटला सल्ला
विशेष प्रतिनिधी
विराट हा लढवय्या खेळाडू आहे. माझ्या अंदाजानुसार त्याचं काहीतरी बिनसलं आहे. We were not brave enough अशा प्रकारचं वक्तव्य कधीच कोणत्याही कॅप्टनच्या तोंडातून यायला नको. तुम्ही देशासाठी खेळत असताना तुमच्याकडून अपेक्षा या केल्याच जाणार. पण जर तुम्ही असं वक्तव्य करणार असाल तर तुमच्यावर टीका ही होणारच असंही कपिल देव यांनी सांगितलं.We were not brave enough-virat
सलग दोन सामन्यांत झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाचं उपांत्य फेरीतलं आव्हान आता जवळपास संपुष्टात आलेलं आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला आपले उर्वरित सामने मोठ्या फरकाने जिंकून उर्वरित संघांच्या निकालावर अवलंबून रहावं लागणार आहे.
टी-२० विश्वचषकात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचा सलग दुसऱ्या सामन्यात पराभव झाला. न्यूझीलंडने भारताला ११० धावांत रोखून ८ विकेत राखत विजयी आव्हान पूर्ण केलं. या खराब कामगिरीनंतर सध्या सर्वच स्तरातून टीम इंडियावर टीका होते आहे. सामना संपल्यानंतर विराट कोहलीने केलेल्या We were not brave enough या वक्तव्याचाही माजी कर्णधार कपिल देव यांची समाचार घेतला.
विराट कोहलीसारख्या खेळाडूने अशा प्रकारची कमजोर वक्तव्य करु नयेत, अशा वक्तव्यांमुळे भारतीय संघाचं मनोधैर्य उंचावणार नाहीये अशी टीका कपिल देव यांनी केलं आहे. कोणत्याही कर्णधाराच्या तोंडातून असं वाक्य कधीच समोर यायला नको असंही कपिल देव यांनी सांगितलं.
“विराट ज्या उंचीचा खेळाडू आहे ते पाहता त्याने केलेलं वक्तव्य हे खरंच निराशाजनक होतं. जर संपूर्ण संघाची देहबोली असेल आणि तुमचा कर्णधारही याच पद्धतीने विचार करत असेल तर तुमच्या संघाचं मनौधैर्य उंचावणं अशक्य आहे. मला विराटचे ते शब्द ऐकून खरंच खूप आश्चर्य वाटलं, तो असा खेळाडू नाहीये”. कपिल देव ABP News च्या कार्यक्रमात बोलत होते.
विराट हा लढवय्या खेळाडू आहे. माझ्या अंदाजानुसार त्याचं काहीतरी बिनसलं आहे. We were not brave enough अशा प्रकारचं वक्तव्य कधीच कोणत्याही कॅप्टनच्या तोंडातून यायला नको. तुम्ही देशासाठी खेळत असताना तुमच्याकडून अपेक्षा या केल्याच जाणार. पण जर तुम्ही असं वक्तव्य करणार असाल तर तुमच्यावर टीका ही होणारच असंही कपिल देव यांनी सांगितलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more