अखिलेश यादव यांनी केलं मोठं विधान, काँग्रेसलाही मिळाला सूचक इशारा

लोकशाही वाचवणे हे क्रांतीपेक्षा कमी नाही. भविष्यात मोठ्या जबाबदारीची ही संधी आहे.असंही म्हणाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

लखनऊ : समाजवादी पार्टी प्रमुख अखिलेश यादव यांनी  सांगितले की, त्यांचा पक्ष इंडिया आघाडीचे नेतृत्व करेल. सपा महाआघाडीत जागा मागत नाही, तर देत आहे, असे अखिलेश म्हणाले. पुढे पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले की, सपा महाआघाडीत जागा मागत नाही, तर देत आहे. आघाडीच्या सर्व मित्रपक्षांशी जागांबाबत चर्चा केली जाईल. आम्ही यापूर्वीही आघाडी केली आणि सपाने त्याग केला. Akhilesh Yadav made a big announcement Congress also got a warning

यावेळी लढत मोठी आहे. सपा सर्वांना बरोबर घेऊन जाईल. लोकशाही आणि संविधान वाचवायचे आहे. समाजवादी पक्षाला डॉ.लोहिया, बाबासाहेब, डॉ.भीमराव आंबेडकर आणि नेताजींच्या मार्गावर चालत संविधान वाचवायचे आहे. तर मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतील समाजवादी पक्षाच्या उमेदवारांबाबत अखिलेश म्हणाले की, सपा अनेक जागांवर मजबूत आहे.

मऊच्या घोसी विधानसभा मतदारसंघातील विजयाने उत्साहित झालेले समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी लढा दिला जाईल, असे म्हटले आहे. मात्र, लोकशाही वाचवणे हे क्रांतीपेक्षा कमी नाही. भविष्यात मोठ्या जबाबदारीची ही संधी आहे. तसेच, उत्तर प्रदेशातील जनतेला केंद्रातून भाजपाचे सरकार जाईल याची खात्री करावी लागेल.

Akhilesh Yadav made a big announcement Congress also got a warning

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात