पवारांची पॉवरफुल खेळी; अदानींच्या लॅक्टोफेरिंग प्लांट एक्झिम पॉवरचे गुजरातेत उद्घाटन!!


वृत्तसंस्था

अहमदाबाद : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सातत्याने गौतम अदानींना आपल्या टार्गेटवर ठेवल्याच्या पार्श्वभूमीवर I.N.D.I आघाडीचे समन्वयक शरद पवार यांनी पॉवरफुल खेळी करत अदानींच्या पहिल्या लॅक्टोफेरिंग प्लांट एक्झिम पॉवरचे उद्घाटन केले आहे. हा देशातला पहिला प्लांट आहे. त्याच्या उद्घाटनाचा बहुमान अदानींनी आपल्याला दिल्याचे ट्विट पवारांनी स्वतःच केले आहे. sharad pawar inaugurate India’s first Lactoferrin Plant Exympower in Vasna

एरवी महाराष्ट्रात पवारांच्या कुठल्याही जिल्हा तालुका पातळीवरील राजकीय खेळीचे वर्णन मराठी माध्यमे “पॉवरफुल खेळी” या शब्दांनी करत असतात. पण गौतम अदानींनी पवारांना गुजरातमध्ये अहमदाबादेत आपल्या घरी बोलावले आणि त्यांना देशातल्या पहिल्या लॅक्टोफेरिंग प्लांट एक्झिम पॉवरचे उद्घाटन करण्याची करण्याचा बहुमान दिला. याचा उल्लेख कोणी पवारांची “पॉवरफुल खेळी”, असा केला नाही.

गेल्या वर्षे दीड वर्षात राहुल गांधींनी गौतम अदानी यांना सातत्याने आपल्या टार्गेटवर ठेवले आहे. आदानींचा उल्लेख ते मोदी आणि अदानी = मोदानी असा करतात. पवारांनी मात्र या विषयावर काँग्रेस पासून स्वतःचे “सुरक्षित” अंतर राखले आहे. अदानींना त्यांच्याकडे मुक्त प्रवेश आहे. 2023 मधली शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यातली ही तिसरी भेट आहे. अजित पवार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला निघून गेल्यानंतरही अदानी पवारांच्या भेटीला सिल्वर ओकवर गेले होते. मात्र या भेटीचे तपशील अधिकृतपणे दोघांनीही सांगितले नव्हते.

आजच्या अहमदाबाद येथील पवार आणि अदानी या दोघांनीच लॅक्टोफेरिंग प्लांट एक्झिम पॉवरचे उद्घाटन केले. यावेळी गुजरात भाजप सरकारमधील कोणी हजर होते की नाही याचे तपशील अदानींनी जाहीर केले नाहीत.

sharad pawar inaugurate India’s first Lactoferrin Plant Exympower in Vasna

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात