प्रतिनिधी
नागपूर : येथे मध्यरात्री ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामुळे शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले. अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप आले. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे शहरातील अनेक घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये तब्बल 5 फुटांपर्यंत पाणी शिरले. दरम्यान, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुरामुळे शहरातील शाळांना सुटीही जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरात अडकलेल्या नागरिकांना तत्काळ मदत करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. यापूर्वी दि. 26, 28 आणि 31 जुलै रोजी नागपुरात मुसळधार पाऊस झाला होता. शुक्रवार 22 जुलै रोजी मध्यरात्रीनंतर रात्रभर ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह आलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे नागपुरात दाणादाण उडाली होती.Rain like cloudburst in Nagpur, holidays declared for schools; Gorewada lake overflowed with Ambazari and water entered the houses
शुक्रवारी मध्यरात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती उद्भवली. नागपुरातील जनजीवन विस्कळीत झाले असून शनिवारी पहाटे 5.30 वाजेपर्यंत नागपुरात 106.7 मिमी झाला. शहरातील रस्ते जलमय झाले, तर अनेक भागांत तलावासारखी स्थिती निर्माण झाली. पूरसदृष्य परिस्थिती लक्षात घेता शाळा-कॉलेजेसना जिल्हाधिकाऱ्यांनी सुटी जाहीर केली आहे.
शहरातील मोरभवन बसस्थानक पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. बर्डी, रामदासपेठ कॅनल रोड, शंकरनगर चौक रस्ता, तसेच नरेंद्र नगर, मनीष नगर, भूयारी पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. शहरातील सखल आणि खोलगट भागातील वस्त्यांसह नागरी वस्त्यांतील घराघरात जवळपास गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांची पाणी काढता काढता दमछाक झाली. नागपूर रेल्वेस्थानक परिसरातही पाणी साचल्याने काही गाड्या उशिराने धावू शकतात.
नागपूर जिल्हा व महानगरातील शाळांना सुटी जाहीर
नागपूर शहरांमध्ये रात्री दोन वाजेपासून सुरू झालेल्या सततधार पावसामुळे शहराच्या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला असून जिल्हा व महानगर प्रशासनाची डिझास्टर मॅनेजमेंट टीम काम करत आहे. सकाळी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी शहरातील अनेक ठिकाणांची पाहणी केली. शहरासह जिल्ह्यातील परिस्थितीवर आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांना (जिल्हा व महानगर क्षेत्र) जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी आज सुटी जाहीर केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App