वृत्तसंस्था
नागपूर : नागपुरात एका क्रिकेटच्या बुकीने एका व्यापाऱ्याला तब्बल 58 कोटी रुपयांचा चुना लावला आणि तो दुबईला पळून गेला. या बुकीच्या गोंदियातल्या घरावर छापा घातल्यावर तब्बल 14 किलो सोने, 200 किलो चांदी आणि 17 कोटी रुपये रोख एवढे प्रचंड घबाड सापडले आहे. अनंत सोंटू नवरतन जैन असे या बुकीचे नाव आहे.58 crore Fraud to a cricket bookie trader in Nagpur
या प्रकरणाची कहाणी अशी :
या प्रकरणाची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
नागपूर पोलिसांच्या सायबर सेलकडे एका व्यावसायिकाची तक्रार आली. एका व्यक्तीने ऑनलाईन सट्ट्यात तब्बल 58 कोटी रुपये उडविले. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर तपासाची चक्रे फिरली आणि क्रिकेट बुकीच्या घराचा ठिकाणा सापडला. त्यानंतर पोलिसांनी गोंदियातील त्याच्या घरी छापा घातला. त्यावेळी पोलिसांना प्रचंड घबाड सापडले.
हे प्रकरण आहे गोंदिया येथील एका आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकीने एका व्यावसायिकाला बनावट सट्टेबाजी अॅप्समध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून 58 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचं. नागपूर पोलिसांनी आरोपीच्या गोंदियातील काका चौकातील घरावर छापा टाकला तेव्हा पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला.
बुकी दुबईला गेला पळून
घरात पोलिसांना 17 कोटींहून अधिक रुपयांची रोकड, सुमारे 14 किलो सोने आणि 200 किलो चांदी सापडली, जी जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी छापा टाकण्यापूर्वीच आरोपी घरातून पळून गेला.
याबद्दल अधिक माहिती अशी की, ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म तयार करणारा कथित ‘बुकी’ अनंत उर्फ सोंटू नवरतन जैन हा गोंदियाचा रहिवासी आहे. पोलिसांनी जैनच्या घरावर छापा घातला, त्याच्या बरोबर आदल्या दिवशी तो आधी दुबई पळून गेला.
व्यावसायिकाला कसे अडकवले जाळ्यात
जैनने तक्रारदाराला म्हणजे संबंधित व्यावसायिकाला ऑनलाइन जुगारातून पैसे कमावण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला त्यांनी टाळाटाळ केली. नंतर व्यावसायिक जैनच्या जाळ्यात अडकला.
त्यानंतर हवाला एजंटमार्फत 8 लाख रुपये हस्तांतरित केले. जैन यांनी व्यावसायिकाला व्हॉट्सअॅपवर ऑनलाइन जुगार खाते उघडण्यासाठी एक लिंक दिली. व्यावसायिकाने खात्यात 8 लाख रुपये जमा केले आणि जुगार खेळायला सुरुवात केली.
सुरुवातीला पैसे मिळाल्यानंतर व्यावसायिकाला नंतर झटके बसू लागले कारण या जुगारात त्याने फक्त 5 कोटी रुपये जिंकले होते, परंतु 58 कोटी रुपये गमावले होते. व्यावसायिक प्रचंड तोट्यात गेला. त्यानंतर व्यावसायिकाला संशय आला आणि त्याने त्याचे पैसे परत मागितले. परंतु जैनने नकार दिला.
व्यावसायिकाने सायबर पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर जैनवर फौजदारी गुन्हा दाखल करून नंतर जैनच्या गोंदिया येथील निवासस्थानावर पोलिसांनी छापा घातला.
घरात सापडला मोठा ऐवज
या छाप्यात आरोपी बुकीच्या घरातून 17 कोटी रुपये रोख, 14 किलो सोने आणि 200 किलो चांदी, सोन्याची बिस्किटे आणि दागिने सापडले. मात्र, बुकी जैन याने आधीच पोलिसांना चकमा दिला. तो दुबईला पळून गेल्याचा संशय आहे. त्याच्या जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत अद्याप निश्चित करणे बाकी आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App