वृत्तसंस्था
नवी दिल्ली : चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अरुणाचल प्रदेशातील तीन वुशू खेळाडूंना योग्य मान्यता आणि सामान्य व्हिसा न देण्याबाबत भारताने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. चीनच्या या कृतीचा निषेध करत क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आपला चीन दौरा रद्द केला. भारताने म्हटले आहे की, हे खेळभावना आणि त्याच्या आचरणाला नियंत्रित करणाऱ्या नियमांचे उल्लंघन आहे.Dragons deny visas to Arunachal Pradesh players; Protest by India’s Sports Minister, China tour cancelled
भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, चिनी अधिकाऱ्यांनी पूर्वनियोजित पद्धतीने अरुणाचल प्रदेशातील खेळाडूंना मान्यता आणि 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रवेश नाकारून त्यांच्याशी भेदभाव केला आहे. भारत सरकार याचा पूर्णपणे निषेध करते. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि यापुढेही राहणार आहे. भारत आपल्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहे.
चिनी अधिकाऱ्यांनी खेळाडूंना जारी केला स्टेपल व्हिसा
अरुणाचलच्या महिला वुशू खेळाडू न्यामन वांग्सू, ओनिलू टेगा आणि मापुंग लामगू हे चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार होते. मात्र, हँगझोऊ आशियाई स्पर्धा आयोजन समितीने मान्यता न दिल्याने चीनने यातील दोन खेळाडूंना स्टेपल व्हिसा दिला. भारत सरकारने स्टेपल्ड व्हिसा घेण्यास नकार दिला. परिणामी दोन खेळाडू फ्लाइटमध्ये चढू शकले नाहीत. दरम्यान, चीन ऑलिम्पिक संघटनेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, वेगवेगळ्या खेळाडूंना वेगवेगळे व्हिसा देण्याचा अधिकार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App