प्रतिनिधी
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज आपला आयोध्या दौरा स्थगित केला. त्यावरून सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू झाली. तर मनसेवर सर्व विरोधी पक्षांचा “टोमणे बॉम्ब” फुटला!! After the cancellation of Ayodhya tour, MNS exploded on the opposition
शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी खोचकपणे तीर्थयात्रेला आम्ही मदत केली असती ना… शिवसेनेचे मदत कक्ष अयोध्या, काशी, मथुरेसह सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये आहेत, असा टोला हाणला.
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपचे खासदार ब्रजभूषण सिंह यांनी देखील राज ठाकरेंवर टीका करायचे सोडले नाही. त्यांचा दौरा रद्द झाला असला तरी अयोध्येत कार्यकर्त्यांचे शरयू स्नान होणार आणि 5 जूनला मुख्यमंत्री उद्धव मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवस वैदिक पद्धतीने साजरा करणार, असे ब्रजभूषण सिंह यांनी जाहीर केले.
तूर्तास अयोध्या दौऱ्याचा भोंगा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटविण्यासाठी नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनिमय सुरू आहे. सविस्तर बोलूच…@mnsadhikrut #Ayodhya #अयोध्या pic.twitter.com/2I3iI7Kge0 — Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 20, 2022
तूर्तास अयोध्या दौऱ्याचा भोंगा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटविण्यासाठी नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनिमय सुरू आहे. सविस्तर बोलूच…@mnsadhikrut #Ayodhya #अयोध्या pic.twitter.com/2I3iI7Kge0
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 20, 2022
तिसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेवर टीकास्त्र सोडताना सध्या अयोध्या दौऱ्याचा भोंगा बंद ठेवायचे ठरले आहे. आता नवीन भोंगा कोणता लावायचा, याचा विचार विनिमय सुरू आहे. लवकरच बोलू, असे खोचक ट्विट केले आहे.
एकूण राज ठाकरे यांनी आपला आयोध्या दौरा थांबवला काय आणि मनसेवर लगेच “टोमणे बॉम्ब” फुटला काय!!, यातून जनतेची मात्र करमणूक झालेली दिसली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App