राज ठाकरे यांच्या जीवाला धोका; उद्धव ठाकरे देणार भावाला झेड प्लस सुरक्षा!!


प्रतिनिधी

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्याचा मुद्दा उचलून धरल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर आता त्यांना एका पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या पत्रामुळे एकच खळबळ माजलेली असताना मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकारकडून राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Raj Thackeray’s life in danger; Uddhav Thackeray will give Z-plus security to his brother

मिळणार झेड प्लस?

राज ठाकरे आणि आपल्याला धमकीचे पत्र आल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. त्यानंतर त्यांनी मंगळवारी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेत त्यांना या संदर्भात पत्र दिले होते. त्यानंतर बुधवारी बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. जवळपास 20 मिनीटे या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मुंबई पोलिस आयुक्त पांडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे यावेळी गृहमंत्र्यांनी नांदगावकर यांना सांगितल्याची माहिती मिळत आहे. तसेच या पत्राबाबत राज्याच्या गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत असून, राज ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे. 

सुरक्षा वाढवण्याचा विचार

राज ठाकरे यांची झेड प्लस सुरक्षा 2020 मध्ये कमी करत ठाकरे सरकारने त्यांना वाय प्लस सुरक्षा देऊ केली. मात्र आता राज ठाकरेंना आलेल्या धमकीच्या पत्रामुळे वरिष्ठ पातळीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या विचार राज्याचे गृहखातं करत असल्याचे म्हटले जात आहे. तसेच बाळा नांदगावकर यांच्याही सुरक्षेत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Raj Thackeray’s life in danger; Uddhav Thackeray will give Z-plus security to his brother

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”