अखिल भारतीय द्रविड मुनेत्र कळघमच्या (एआयएडीएमके) माजी नेत्या व्ही. के. शशिकला यांच्याशी संवाद साधल्याच्या कारणावरून पक्षाच्या १६ पदाधिकाऱ्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. त्याचबरोबरप क्षाचे प्रवक्ते व्ही. पुगाझेंडी यांच्यावरही पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.After interacting with Shashikala, 16 AIDMK office bearers were expelled from the party
विशेष प्रतिनिधी
चेन्नई : अखिल भारतीय द्रविड मुनेत्र कळघमच्या (एआयएडीएमके) माजी नेत्या व्ही. के. शशिकला यांच्याशी संवाद साधल्याच्या कारणावरून पक्षाच्या १६ पदाधिकाऱ्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. त्याचबरोबरप क्षाचे प्रवक्ते व्ही. पुगाझेंडी यांच्यावरही पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
शशिकला यांनी पक्षाच्या सदस्यांशी केलेला कथित संवाद हा ड्रामा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. केवळ एका कुटुंबांच्या इच्छेसाठी पक्षाला पणाला लावले जाणार नाही, असेही एआयएडीएमकेकडून म्हटले आहे.
शशिकला या तामीळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या अत्यंत निकटवर्तीय मानल्या जातात. मात्र, त्यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा आरोप करण्यात आला होता. एआयएडीएमकेचे नेते सी. पुनीयन यांनी शनिवारी आरोप केला होता की शशिकला आता पक्षाच्या सदस्य नाहीत.
कारण त्या टीटीव्ही दिनकरन यांच्या अम्मा मक्कल मुनेत्रा कळघम (एमएमएमके) पक्षात गेल्या आहेत. त्यामुळे एआयडीएमकेला पुन्हा चांगले दिवस आणण्यासाठी काम करू म्हणण्याचा काहीही अधिकार नाही. उलट जे शशिकला यांच्याशी संवाद साधतील ते पक्षाचे सदस्य नाहीत असे मानण्यात येईल.
आपण पुन्हा एकदा सक्रीय राजकारणात प्रवेश करणार आहोत, असे संकेत शशिकला यांनी दिले होते. यासंदर्भातील शशिकला आणि एका कार्यकर्त्याचे फोनवरील संभाषण व्हायरल झाले होते. हा नेता शशिकला यांच्या निर्णयाचे स्वागत करत होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more