विशेष प्रतिनिधी
काठमांडू : गया, बद्रीनाथ याशिवाय कटिहार जिल्ह्यात मनिहारी, काढागोला आणि भागलपूर येथील बरारी घाटावर अस्थी विसर्जित करण्यासाठी नेपाळचे नागरिक मोठ्या संख्येने येतात. मात्र आता सीमा बंद राहिल्याने नेपाळमध्ये स्थायिक झालेले भारतीय आणि नेपाळी नागरिकांना आपल्या नातेवाइकांच्या अस्थी सांभाळून ठेवाव्या लागत आहेत. Adverse imapact of cororna on lifestyle in Nepal
कोविडच्या संसर्गामुळे गेल्या वर्षभरापासून भारत आणि नेपाळच्या सीमा बंद असल्याने उभय देशातील पारंपारिक व्यवहारांवर परिणाम होत आहे. राणी देवी यांच्या वडिलांचे निधन चौदा महिन्यांपूर्वी नेपाळच्या सुनसरी येथे झाले. नातेवाईक त्यांच्या अस्थी गंगा नदीत विसर्जित करण्याची तयारी होते. मात्र लॉकडाउन लागू करण्यात आला आणि तेव्हापासून वडिलांच्या अस्थी दरवाजाच्या बाजूला असलेल्या मंदिराच्या प्रांगणात ठेवल्या आहेत.
नेपाळी नागरिकांसाठी अस्थी आणि अन्य कर्मकांडसंबंधी नेपाळ-भारत सीमेवर जोगबनी रेल्वे स्थानकात विशेष गाडीची सोय उपलब्ध आहे. तेथून आरक्षित गाडीतून नेपाळी नागरिकांना अस्थी विसर्जनासाठी जाता येत होते. परंतु लॉकडाउननंतर गाडीचे बुकिंग बंद झाले. चौदा महिन्याच्या काळात केवळ ४३ गाड्यांचे बुकिंग झाले. तत्पूर्वी दररोज ५० गाड्या बुक व्हायच्या. परंतु ती संख्या कमी झाली. दीर्घकाळ वाट पाहूनही सीमा सुरू होत नसल्याने अनेक नेपाळी नागरिक स्थानिक नदीतच आपल्या आप्तेष्टांचे अस्थीविसर्जन करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App