विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : या लोकसभा निवडणुकीत हैदराबादची लढत रंजक बनली आहे. या जागेवरून भाजपने माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. तेलंगणातील सर्व 17 लोकसभा जागांपैकी सर्वात हाय-प्रोफाइल असलेल्या हैदराबादमध्ये त्या AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात उभ्या आहेत. ही जागा 1984 पासून ओवेसी कुटुंबाकडे आहे. माधवी लता आपल्या सामाजिक कार्यामुळे चर्चेत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नुकतेच त्यांचे कौतुक केले होते.Adding to Owaisi’s worries, BJP’s Madhavi Lata is hugely popular even among Muslims, a challenge in Hyderabad
49 वर्षीय माधवी लता या व्यावसायिक असण्यासोबतच सामाजिक कार्यकर्त्याही आहेत आणि मुस्लिमबहुल जुन्या शहरात दीर्घकाळापासून कार्यरत आहेत. कोणतीही विशेष राजकीय पार्श्वभूमी नसतानाही माधवी लता आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. व्यावसायिक भरतनाट्यम नृत्यांगना असलेल्या माधवी लता यांनी तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांनी 2018 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि गुंटूर पश्चिम मतदारसंघातून 2019 ची आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
माधवी लता मुस्लिमांमध्येही लोकप्रिय
मुस्लिम समाजात लोकप्रिय असलेल्या माधवी लता यांना उमेदवारी देण्यामागचे एक कारण म्हणजे त्या मुस्लिम महिलांच्या उन्नतीसाठी काम करतात आणि त्यांच्यात खूप लोकप्रिय आहेत. याशिवाय प्रबळ वक्ता असणंही त्यांच्या बाजूने आहे. माधवी लता निराधार मुस्लिम महिलांना आर्थिक मदतही करत आहेत. त्यांनी तिहेरी तलाकविरोधातही प्रचार केला. निवडणुकीत मुस्लिम महिलांचा पाठिंबा मिळेल, असा दावा खुद्द माधवी लता यांनी केला आहे.
वर्षभरापासून या मतदारसंघात काम करत असल्याचा माधवी लताचा दावा आहे. या निवडणुकीत ओवेसींना माधवींचे तगडे आव्हान यामुळेच आहे. हैदराबादची जागा एआयएमआयएमचा बालेकिल्ला आहे. ओवेसी हा मुस्लिम चेहरा आहे, तर माधवी लताची प्रतिमा कट्टर हिंदुत्व समर्थक अशी आहे. दोघांमध्ये विचारधारांची लढाई आहे.
सात विधानसभा जागा असलेल्या हैदराबाद लोकसभा जागेवर भाजपचे सुमारे 19 लाख मतदार आहेत. हैदराबादमधील सात विधानसभेच्या जागांपैकी गोशामहलमध्ये फक्त एक जागा भाजपचे आमदार केटी राजा सिंह यांच्याकडे आहे. उर्वरित जागा एआयएमआयएमच्या आमदारांकडे आहेत.
सोशल मीडियावर सक्रिय
माधवी लता या लताम्मा फाउंडेशन आणि लोपामुद्रा चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त आहेत. माधवी लता यांचे हैदराबाद येथे रुग्णालयही आहे. त्या या रुग्णालयाच्या प्रमुख आहेत. त्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि हिंदुत्ववादी भूमिकेमुळे चर्चेत असतात. माधवी लता एक गोशाळाही चालवतात आणि नियमितपणे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिंदुत्व आणि भारतीय संस्कृती यावर व्याख्याने देतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App