वृत्तसंस्था
अहमदाबाद : देशातील आघाडीचा अदानी ग्रुप एनडीटीव्ही मीडिया ग्रुपचे 29.18 % शेअर्स विकत घेणार आहे. त्याचबरोबर आणखी 26 % शेअर्स खरेदी करण्याची खुली ऑफरही दिली आहे. अदानी ग्रुपने आपल्या अधिकृत निवेदनात ही माहिती दिली आहे. 2024 लोकसभा निवडणुकीपूर्वीची ही मीडिया मॅनेजमेंट असल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे. Adani Group to acquire 29.18% stake in NDTV Media Group
एनडीटीव्हीचे शेअर्स घेण्याबाबत अदानी ग्रुपने निवेदन प्रसिद्ध केले आहे. अदानी ग्रुपची उपकंपनी असलेली एनडीटीव्ही मीडिया नेटवर्क्स लिमिटेड न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेडमधील 29.18 % हिस्सा विकत घेणार आहे. तसेच उर्वरित 26 % हिस्सा विकत घेण्याची ऑफरही अदानी ग्रुपने एनडीटीव्हीला दिली आहे. यासाठी 493 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे.
ज्याच्या एका शेअरची किंमत 294 रुपये असेल. या व्यवहारामुळे एनडीटीव्हीच्या शेअर्सने शेअर बाजारात 5 %उसळी मारलेली पहायला मिळाली. ज्यामुळे त्याची किंमत 376.55 रुपयांवर पोहोचली.
एनडीटीवी वर प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांचे वर्चस्व आहे. संपादकीय धोरणानुसार एनडीटीव्ही मोदी सरकारचा विरोधक मानला जातो या पार्श्वभूमीवर अदानी ग्रुप कडे एनडीटीव्हीचा मोठा वाटा जाणे याला राजकीय दृष्ट्या देखील वेगळे महत्त्व आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more