राष्ट्रवादी अल्पसंख्यांक मेळावा : बिल्कीस बानो प्रकरणावरून शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर बरेच दिवस नवनाथ असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आज प्रथमच जाहीररित्या बोलले, ते देखील दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक मेळाव्यात!! या मेळाव्यात शरद पवारांनी गुजरात मधील बिल्कीस बानू प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधले. Sharad Pawar targets Prime Minister Modi over Bilquis Bano case

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट च्या भाषणामध्ये महिला सन्मानाविषयी भाष्य केले होते. आज तोच धागा पकडून शरद पवारांनी त्यांच्यावर बिल्कीस बानो प्रकरणात निशाणा साधला आहे. 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये महिलांच्या सन्मानाविषयी आत्मसनमानाविषयी बोलायचे आणि गुजरातमध्ये निर्दोष महिलेवर बलात्कार करणाऱ्यांना निर्दोष सोडून द्यायचे ही सत्ताधार्‍यांची दुटप्पी भूमिका आहे. बिल्कीस बानो हिच्यावर कशाप्रकारे अत्याचार झाले सगळ्यांना माहिती आहे. तरी देखील अत्याचार करणारे निर्दोष सुटतात ही राज्यकर्त्यांची कोणती मानसिकता आहे??, असा सवाल शरद पवारांनी पंतप्रधान मोदींचे नाव न घेता केला आहे.


Sharad Pawar – Chandrakant Patil : भव्य हिमालय तुमचा आमुचा ज्याची त्याची “बारामती”…!!


ईडी, सीबीआय कारवायांवर निशाणा

दिल्लीतील अल्पसंख्यांक मेळाव्यात पवारांनी केंद्रीय तपास संस्था सीबीआय, ईडी यांच्या तपास कामावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संजय राऊत आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावरील कारवाईबाबत शरद पवारांनी संताप व्यक्त केला. केंद्रीय तपास संस्थांचा गैरवापर करून भाजप वेगवेगळ्या राज्यांमधली सत्ता बळकावत आहे. भाजपला बहुमत मिळाले आहे पण ते बहुमत खरे नाही. धाकदपटशातून त्यांनी ते बहुमत मिळवले आहे. जनतेच्या मनात सध्या संभ्रमावस्था आहे. विरोधी पक्षांनी भाजपला मदत होईल अशा पद्धतीने आपली राजकीय वर्तणूक ठेवू नये, असा इशारा त्यांनी मनीष सिसोदिया प्रकरणावरून काँग्रेसला दिला आहे.

 सिसोदिया प्रकरणावरून काँग्रेसला इशारा

मनीष सिसोदिया यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यानंतर काँग्रेसने आम आदमी पार्टीवर शरसंधान साधले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आम आदमी पार्टीची बाजू घेत काँग्रेसला इशारा दिल्याने तो दिल्लीत राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

Sharad Pawar targets Prime Minister Modi over Bilquis Bano case

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात