आमच्याकडे सगळ्यांचा कच्चा चिठ्ठा!!; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विधानसभेत विरोधकांना सूचक इशारा


प्रतिनिधी

मुंबई : आमच्याकडे सगळ्यांचा कच्चा चिठ्ठा आहे, पण आम्हाला कामाने उत्तर द्यायचे आहे. परंतु, विरोधी पक्षांची टीका टिप्पणी सहन करायला, आरोप सहन करायला काही मर्यादा असतात, असा सूचक इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत विरोधकांना दिला आहे. Chief Minister Eknath Shinde’s warning to the opposition in the Legislative Assembly

विधीमंडळ अधिवेशन काळात दररोज विरोधक एकनाथ शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावरून वेगवेगळ्या घोषणा देत होते. 50 खोके, एकदम ओके!!, 50 खोके खाऊन माजलेत बोके अशा या घोषणा होत्या. याच मुद्द्यावरून सर्व विरोधकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमचा सगळ्या कच्चा आमच्याकडे आहे, अशा शब्दांमध्ये सूचक इशारा दिला आहे.

विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी वाढली आहे. रात्री ३.३० पर्यंत मी काम करतो, पुन्हा सकाळी ७.३० पासून कामकाज सुरू होते. पण, विरोधक चांगल्याला चांगले म्हणत नाहीत. सगळ्यांनी एकत्र येऊन काम केले, तर महाराष्ट्राच्या विकासाची गती आणखी वेगवान होईल.

स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढवणार

पाऊस आणि इतर हवामान विषयक बाबींचे मोजमाप करण्यासाठी यापूर्वी प्रत्येक २,४०० महसूल मंडळात एक स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आलेले आहे. ही संख्या अपुरी असल्यामुळे स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढविण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांना अचूक हवामानाचा अंदाज मिळेल व विमा दावे वेगाने निकाली काढता येतील.

 मुख्यमंत्र्यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

अंबाजोगाई नगर परिषदेतील चार अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी

‘त्या’ मृत गोविंदाच्या कुटूंबियांना तत्काळ दहा लाखांची मदत

गोंदिया, भंडारा प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करणार

मुंबई पालिका क्षेत्रातील रस्ते काँक्रीटचे करणार

Chief Minister Eknath Shinde’s warning to the opposition in the Legislative Assembly

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात