हेमंत करकरेंचा मृत्यू कसाबच्या गोळीने नाही??; वडेट्टीवारांच्या दाव्याला शशी थरूर यांचे समर्थन!!

विशेष प्रतिनिधी

पुणे : वरिष्ठ पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांचा मृत्यू दहशतवादी अजमल कसाब याच्या गोळीने नव्हे, तर संघ समर्थित पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीने झाला, असा धक्कादायक दावा काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कालच केला होता. त्यामुळे महाराष्ट्राचा संपूर्ण देशामध्ये मोठी खळबळ माजली. about the killing of former Maharashtra ATS chief Hemant Karkare, Congress MP Shashi Tharoor

पण त्या पलीकडे जाऊन मुंबई हल्ल्याचा सगळा खटला सरकारी पातळीवर कोर्टात चालवून अजमल कसाबला फाशीची शिक्षा ठोठावणाऱ्या वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्यावर वडेट्टीवार यांनी थेट देशद्रोहाचा आरोप ठेवला. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस विरुद्ध भाजपाशी मोठी खडाजंगी झाली. या खडाजंगीत उतरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनी वडेट्टीवार यांचे समर्थन केले.

विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले, विरोधी पक्ष नेत्यांनी केलेल्या या आरोपाची गांभीर्याने चौकशी व्हायला हवी होती, असे मला वाटते. अजूनही उशीर झालेला नाही. कारण अशा महत्त्वाच्या विषयावर, खरोखर नेमके काय घडले हे जाणून घेण्याचा देशातल्या नागरिकांना पूर्ण अधिकार आहे.

मूळात हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. आमच्या चिंतेची बाब अशी आहे की जेव्हा LoP काही काळापासून सार्वजनिक डोमेनमध्ये असलेला आरोप आहे आणि जो माजी पोलिस महानिरीक्षक शमीम मुश्रीफ यांच्या पुस्तकात आहे. करकरेंच्या अंगात सापडलेल्या गोळ्या अजमल कसाबने चालवलेल्या नसतील आणि पोलिसांच्या रिव्हॉल्व्हरमधल्या त्या गोळ्या असतील तर, या आरोपांची गांभीर्याने चौकशी व्हायला हवी होती आणि आता उशीर झालेला नाही. कारण अशा महत्त्वाच्या प्रकरणावर, खरोखर नेमके काय घडले हे जाणून घेण्याचा देशातल्या नागरिकांना पूर्ण अधिकार आहे. आम्ही असे म्हणत नाही की हे आरोप निश्चितपणे खरेच आहेत. पण त्यांची कसून चौकशी व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे, असे शशी थरूर म्हणाले.

about the killing of former Maharashtra ATS chief Hemant Karkare, Congress MP Shashi Tharoor

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात