विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पुलवामाच्या दुःसाहसानंतर पाकिस्तानला भारताकडून एअर स्ट्राइकने उत्तर मिळाले. पण त्या एअर स्ट्राइक दरम्यान भारतीय लढाऊ वैमानिक अभिनंदन वर्धमान पाकिस्तानाच्या तावडीत सापडला. त्यावेळी पाकिस्तान यांना हर्षवायू झाला होता. भारताला आता आपण नाक मुठीत धरायला लावून वाकवू शकू, अशी पाकिस्तानी राज्यकर्त्यांची आणि लष्कराची धारणा झाली होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका खेळीने पाकिस्तानवर त्यांचीच बाजू उलटवून लावलीAbhinandan was caught PM Modi didn’t even pick up Imran Khan’s phone in “that” midnight; Exposed in the new book of the Indian High Commissioner
अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या तावडीत सापडल्याचे समजल्यानंतर ताबडतोब भारतीय लष्कराने आपली 9 मिसाईल्स पाकिस्तानी बॉर्डरवर तैनात केली आणि त्याची तोंडे पाकिस्तानी लष्कराच्या तळांकडे करून ठेवली. पाकिस्तानने कुठलीही हिमाकत केली असती, तर ही 9 मिसाईल्स पाकिस्तानच्या लष्करी तळांवर जाऊन आदळली असती आणि पाकिस्तानचे अपरिमित नुकसान केले असते.
भारतीय लष्कराच्या या विध्वंसक तयारीची माहिती पाकिस्तानी लष्कराला मिळताच त्यांचे धाबे दणाणले आणि मध्यरात्री पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारतीय उत्सायुक्तालयाचे दरवाजे ठोठावले. भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना संपर्क करायची विनंती केली. पाकिस्तानची त्यावेळचे पंतप्रधान इम्रान खान यांना थेट पंतप्रधान मोदींशी बोलायचे होते. अजय बिसारिया यांनी त्यानुसार प्रयत्न केले. परंतु पंतप्रधान मोदी फोनवर आले नाहीत. त्यांनी पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खानशी बातचीत करायला नकार दिला. त्यामुळे पाकिस्तानी सरकार आणि लष्कर मोदींची ही चाल अपेक्षित नव्हती पण पंतप्रधान मोदींच्या चालीने ते हादरले.
अभिनंदन वर्धमान पकडला गेल्याच्या निमित्ताने भारताला नाक मुठीत धरून वाकवायचा पाकिस्तान्यांचा इरादा हवेत उडून गेला आणि अभिनंदनला त्यांना शांतपणे मुक्त करावे लागले. त्या सगळ्या घटनाक्रमाचा खुलासा अजय बिसारिया यांनी आपल्या Anger Management : The Troubled Diplomatic Relationship Between India and Pakistan या नव्या पुस्तकात केला आहे. यातून त्यांनी भारताचे आक्रमक परराष्ट्र धोरण किती परिणामकारक ठरले, याचेच प्रत्यंतर आणून दिले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App