या प्रकरणात त्यांच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे.
विशेष प्रतिनिधी
पणजी : आम आदमी पार्टीच्या नेत्यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. दिल्लीतील मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्यानंतर आता गोव्यातील पक्षप्रमुख अमित पालेकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. रोड रेज प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. आता या घटनेबाबत पालेकर यांनी हा सरकारच्या आपल्याविरोधातील गलिच्छ राजकारणाचा भाग असल्याचे म्हटले आहे. Aam Aadmi Party Goa chief Amit Palekar arrested
या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सरकारला माझ्या विरुद्ध काहीही सापडत नाही म्हणून आता मला या प्रकरणात गोवले आहे. आलिशान कारने तीन जणांची चिरडून हत्या केल्याप्रकरणी गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने पालेकर यांना अटक केली आहे. या प्रकरणात त्यांच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसात ही घटना घडली. पोलिसांनी पालेकरविरुद्ध भादंवि कलम २०१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, पालेकर एका व्यक्तीसोबत पोलिस ठाण्यात आले होते आणि त्यांनी सांगितले होते की तोच ड्रायव्हर आहे जो एसयूव्ही चालवत होता. त्या गाडीच्या चालकाला वाचवता यावे म्हणून पालेकर असे सांगत असल्याचे त्यांनी सांगितले.
याचबरोबर पालेकर यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, मला अनेक दिवसांपासून धमक्या दिल्या जात होत्या की तुम्ही भारतीय जनता पक्षात सामील झाला नाहीत, आता त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. माझी प्रतिमा बदनाम करण्यासाठी आणि डागाळण्यासाठी मला यात ओढले जात आहे. यापूर्वी गोवा पोलिसांनी याप्रकरणी परेश नावाच्या आरोपीला अटक केली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App