“इंडिया” आघाडीची ताकद बघून घुसखोरी करणारा चीन देखील मागे हटेल!!; संजय राऊतांचे अजब तर्कट


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत सोनिया गांधी, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, एम. के. स्टालिन, नितीश कुमार, अरविंद केजरीवाल या नेत्यांना पाहून उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत एवढे हरकले, की त्यांनी जणू काही “इंडिया” आघाडी लोकसभा निवडणुकीतले मतदान होण्यापूर्वी जिंकली आहे, असा आव आणून एक अजब तर्कट मांडून टाकले. Sanjay Raut’s strange logic

भारतातल्या “इंडिया” आघाडीचे यश पाहून घुसखोरी करणारा चीन देखील मागे हटेल, असे अजब वक्तव्य राऊत यांनी ग्रँड हयात हॉटेलमध्ये हजर असलेल्या पत्रकारांसमोर करून टाकले. सकाळी 9.00 वाजताच्या पत्रकार परिषदेत त्यांनी “इंडिया” आघाडीला हरविणे कोणाच्या बापाला शक्य नाही, असे उर्मट उद्गार काढलेच होते. त्या उर्मट उद्गारांमध्ये सायंकाळी त्यांनी अजब तर्कटाची भर घालून “इंडिया” आघाडीतल्या यशाच्या बळावर चीनला देखील मागे हटवून “दाखविले”.

“इंडिया” आघाडीची औपचारिक बैठक उद्या 1 सप्टेंबरला होत आहे, पण त्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी आज ग्रँड हयात हॉटेलमध्ये आघाडीतल्या सगळ्या नेत्यांना खास मराठी मेजवानी दिली. त्यात वडापाव पासून श्रीखंड पुरी, पुरणपोळी या मेनूची रेलचेल होती. या बैठकीला 28 पक्षांचे 76 नेते आल्याचे सांगितले जात आहे. पण प्रत्यक्षातला आकडा अजूनही गुलदस्त्यातच आहे.

Sanjay Raut’s strange logic

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात