विशेष प्रतिनिधी
मुंबई : आज तक आणि न्यूज नेशन या हिंदी वृत्तवाहिन्यांच्या बेजबाबदार पत्रकारितेमुळे अभिनेता उमेश कामत याला प्रचंड मनस्ताप भोगावा लागला आहे. या प्रकरणातील एक आरोपी आणि राज कुंद्रा याचा व्यवस्थापकीय संचालक म्हणून या वाहिन्यांनी अभिनेता उमेश कामत यांचा फोटो लावला.Aaj Tak, News Nation’s irresponsible journalism has used a photo of actor Umesh Kamat as an accused in the Raj Kundra case.
त्यामुळे उमेश आणि त्याचे कुटुंबिय देशभरातून आलेल्या फोनमुळे अगदी हैराण झाले होते.याबाबत उमेश कामत याने फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की,राज कुंद्रा प्रकरणात चालविण्यात आलेल्या बातमीमध्ये या प्रकरणातील एक आरोपी उमेश कामत म्हणून माझा फोटो लावला जातो आहे.
कुठलीही शहानिशा न करता वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणात माझा फोटो लावून माझी बदनामी केली आहे. या प्रकारामुळे होणाºया माझ्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक हानीसाठी या वृत्तमाध्यमांना जबाबदार धरले जाईल. या प्रकरणी संबधितांवर मी योग्य ती कायदेशिर कारवाई निश्चित करेल
उमेश कामत याने म्हटले आहे की, तुमच्या बातम्यांच्या स्पर्धेमुळे एखाद्याचे किती नुकसान करत आहात याची कल्पना नाही. राज कुंद्रा प्रकरणात माझा फोटो वापरण्यात आला आणि देशभरातून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांवर प्रश्नांची बरसात सुरू झाली.
त्यामुळे मला प्रचंड मनस्ताप झाला आहे. त्यानंतर मी तातडीने सोशल मीडियावर तो उमेश कामत म्हणजे मी नव्हेच असे सांगितले. माझे सर्वांना आवाहन आहे की या अत्यंत तथ्यहिन बातमीवर कोणीही विश्वास ठेऊ नये आणि मला पाठिंबा द्यावा. परंतु, तरीही माझे वैयक्तिक प्रचंड नुकसान झाले आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याला अश्लिल चित्रपट बनवून ते प्रकाशित केल्याप्रकरणी पोलीसांनी अटक केली आहे. वेब सीरिजच्या नावाखाली अश्लील चित्रपट बनवण्याचे रॅकेट उघडकीस आले होते.
या प्रकरणात उमेश कामत यालाही अटक करण्यात आली आहे. उमेश कामत हाराज कुंद्राच्या कंपनीत व्यवस्थापकीय संचालक होता. मात्र, अभिनेता उमेश कामत आणि हा उमेश कामत पूर्णपणे वेगळे आहेत. मात्र, या वाहिन्यांनी अभिनेता उमेश कामत याचा फोटो वापरला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App