नवी मुंबई विमानतळ जाळून टाकण्याची धमकी, पनवेलच्या उपमहापौरांविरुध्द न्यायालयात याचिका

विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकरी कामगार पक्षाचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले नाही तर विमानतळ जाळून टाकू अशी धमकी पनवेलचे उपमहापौर जगदिश गायकवाड यांनी दिली आहे. याबाबत अ‍ॅड. फिजी फ्रेडरिक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.Threat to burn down Navi Mumbai airport, petition in court against Deputy Mayor of Panvel

फ्रेडरिक यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की विमानतळाच्या नामकरणाबाबत केंद्राची काय भूमिका आहे याबाबतची नियमावली न्यायालयाने मागविली आहे. मात्र, दरम्यानच्या काळात गायकवाड यांनी अत्यंत गंभीर धमक्या दिल्या आहेत. अगदी विमानतळ जाळून टाकू असे त्यांनी म्हटले आहे.न्यायालयाने फ्रेडरिक यांना विचारले की विमानतळाचे किती काम झाले आहे. त्यावर त्यांनी सांगितले की तीन धावपट्यांचे काम पूर्ण झाले आहे. सुमारे साठ टक्के काम झालेले आहे. मात्र, गायकवाड यांनी विमानतळच जाळून टाकण्याची धमकी दिली आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत ज्येष्ठ शेकाप नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. यासाठी पनवेल, उरणसह इतर तालुक्यांमधील नागरिकांनी आंदोलनही सुरू केले आहे.

लोकप्रतिनिधींपैकी एकही सदस्य संचालक मंडळाच्या बैठकीला उपस्थित नसताना सिडको महामंडळाने १७ एप्रिलला विमानतळाला नाव देण्याचा राजकीय निर्णय का घेतला, असा प्रश्न प्रकल्पग्रस्त समितीने उपस्थित केला आहे. २०१३ नंतर वेळोवेळी लोकसभेत, त्यानंतर विधिमंडळात दि. बा. पाटील यांच्या नावाची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती.

Threat to burn down Navi Mumbai airport, petition in court against Deputy Mayor of Panvel

महत्त्वाच्या बातम्या