विशेष प्रतिनिधी
पुणे : आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण न करू शकलेल्या भटक्या आत्म्याने आधी महाराष्ट्र अस्थिर केला आणि आता तो आत्मा देश अस्थिर करायला निघालाय, अशा परखड शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांवर पुण्याच्या जाहीर सभेत जबरदस्त प्रहार केला. A wandering soul destabilized Maharashtra, now it is going to destabilize the country
पुण्याच्या रेसकोर्स मैदानावर पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी घेतलेल्या प्रचंड जाहीर सभेत पंतप्रधान मोदींनी प्रखर शब्दांमध्ये शरद पवार आणि राहुल गांधी यांचे अक्षरशः वाभाडे काढले.
नरेंद्र मोदी म्हणाले, महाराष्ट्राचे हे दुर्दैव आहे की या राज्याने गेल्या कित्येक वर्षांमध्ये स्थिर सरकारच पाहिले नाही. महाराष्ट्रात आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण न करू शकलेला एक भटकता आत्मा फिरतो आहे. तो सगळा महाराष्ट्र अस्थिर करतो आहे. आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली नाही ना, मग इतरांनाही काम करू द्यायचे नाही, हे त्या भटकत्या आत्म्याचे काम झाले आहे. 45 वर्षांपूर्वी या भटक्या आत्म्याने महाराष्ट्र अस्थिर करण्याचे काम सुरू केले. 1995 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना – भाजप युतीचे सरकार आले तेव्हा सुद्धा हा भटकता आत्मा महाराष्ट्र अस्थिर करण्याच्या नादी लागला होता. 2019 मध्ये तर या भटकत्या आत्म्याने कमालच केली. संपूर्ण महाराष्ट्राने महायुतीच्या बाजूने दिलेला कौल धुडकावला. पण या भटकत्या आत्म्याचे स्वप्न फार काळ नंतर पूर्ण होऊ शकले नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात स्थिर सरकार आले आहे आणि ते चांगले काम करत आहे. पण हा भटकता आत्मा आता देशात अस्थिरता निर्माण करायला निघाला आहे. देशातले स्थिर सरकार प्रगती करते आहे हे या भटकत्या आत्म्याला पाहावत नाही, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना अक्षरशः ठोकून काढले.
– राहुल गांधींची धुलाई
त्यानंतर मोदींनी आपला मोहरा राहुल गांधी यांच्याकडे वळवला त्यावेळी जनसमुदायातून मोदींना उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. तो प्रतिसाद पाहून मोदी खुलले आणि तुम्ही माझ्या भाषणात याच मुद्द्याची वाट पाहत होता का??, असा सवाल करून मोदींनी पुढचे भाषण सुरू केले. मोदींनी राहुल गांधींना काँग्रेसचे शहजादे असे संबोधत काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चिरफाड केली.
काँग्रेसने देशात जातीवादी राजकारण करून ओबीसी दलित आदिवासी यांना भडकवण्याचे काम केले, पण ओबीसींच्या आरक्षणामध्ये मुसलमानांना घुसवून 27 % च्या आरक्षणात मुसलमानांना वाटेकरी केले. काँग्रेसने हा प्रयोग कर्नाटकात केला आणि इथून पुढे त्यांना हा प्रयोग देशभरात करायचा आहे, असा आरोप मोदींनी केला, पण त्याच वेळी जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत काँग्रेसचे हे मनसुबे साध्य होणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App