दहशतवादी हल्ल्याची भीती वर्तवली जात आहे. A bus carrying passengers to Jammu got derailed, many died fear of terrorist attack
विशेष प्रतिनिधी
जम्मू विभागातील रियासी जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी संशयित दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबारानंतर यात्रेकरूंनी भरलेली बस खोल दरीत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक अहवालाचा हवाला देत अधिकाऱ्यांनी सांगितले की, कटराहून शिवखोडीला जाणाऱ्या यात्रेकरूंनी भरलेल्या बसवर पोनी परिसरात हल्ला करण्यात आला.
बचावकार्य सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस, लष्कर आणि निमलष्करी दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळावरून गोळीही जप्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर परिसराची नाकाबंदीही करण्यात आली आहे.
जवळच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवखोडी धार्मिक स्थळाला भेट देऊन परतणाऱ्या प्रवाशांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतरच बसला अपघात झाला. 10 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे, मात्र अद्याप या प्रकरणी अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App