मोदींची 72 मंत्र्यांची नावे निश्चित होऊन त्यांचा शपथविधीही झाला, पण राहुल गांधींचे विरोधी पक्ष नेतेपद कुठे अडकलेय??

PM Modi took oath of office with 66 ministers

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळवता आले नाही, तरी एनडीएच्या बहुमताच्या बळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या अन्य 72 मंत्र्यांसह शपथ घेतली. त्यांची नावे दोन दिवसांमध्ये निश्चित करून काल रात्री त्यांचा शपथविधी देखील पार पडला, पण एवढे सगळे होऊनही 99 ची मॅजिक साध्य करणाऱ्या राहुल गांधींचे विरोधी पक्षनेते पद मात्र कुठे अडकले ते समजायला तयार नाही.PM Modi took oath of office with 72 ministers, but rahul Gandhi yet not taken decision on opposition leadership

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी काल विदेशी पाहुण्यांच्या आणि तब्बल आठ हजार लोकांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात शानदार समारंभात पार पडला. या शपथविधी मध्ये मोदींसह 72 मंत्र्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली. मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांच्यासह 31 कॅबिनेट मंत्री, 6 राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार असून 36 राज्यमंत्री असे एकूण 72 मंत्री आहेत आहेत. या सगळ्या मंत्र्यांची नावे मोदींनी दोन दिवसात निश्चित केली. त्यांच्याशी काल सकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी संवाद साधला आणि सायंकाळी या सगळ्यांना राष्ट्रपतींनी शपथ देखील दिली. मोदींनी ज्यांना वगळायचे त्यांना वगळले, ज्यांना नव्याने समाविष्ट करायचे त्यांना समाविष्ट केले. यामध्ये जगत प्रकाश नड्डा, शिवराज सिंह चौहान, मनोहर लाल खट्टर यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश केला, तर स्मृती इराणी, नारायण राणे यांच्यासारख्या नेत्यांना मंत्रिमंडळातून वगळले. ही सगळी राजकीय कसरत मोदींनी दोन दिवसांमध्ये केली.



मोदींची मंत्रिमंडळाच्या नावांची निश्चिती होण्यापूर्वी काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक होऊन सोनिया गांधी यांची काँग्रेस संसदीय दलाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. त्याआधी विस्तारित काँग्रेस कार्यकारिणीची बैठक राजधानीतल्या अशोका हॉटेलमध्ये झाली. त्या बैठकीत राहुल गांधींनी लोकसभेतले विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारावे, असा ठराव विस्तारित काँग्रेस कार्यकारिणीने एकमुखाने मंजूर केला. मात्र या ठरावावर राहुल गांधींनी लगेच अनुकूल प्रतिसाद दिला नाही. लोकसभेतले विरोधी पक्षनेते पद स्वीकारणार की नाही, यावर आपण विचार करून निर्णय कळवू, एवढे संक्षिप्त उत्तर त्यांनी दोन दिवसांपूर्वी दिले.

दरम्यानच्या दोन दिवसांत मोदींचे अख्खे मंत्रिमंडळ शपथ घेऊन कामाला लागले, पण राहुल गांधींचा लोकसभेतले विरोधी पक्षनेते पद स्वीकारायचे की नाही??, याचा निर्णय मात्र अद्याप झालेला नाही. राहुल गांधी हे नेतेपद स्वीकारणार की नाही??, ते मोदींसमोर लोकसभेमध्ये ठामपणे उभे राहणार की नाही??, की ते विरोधी पक्ष नेतेपदासारखे घटनात्मक पद स्वीकारणे टाळून, ते इतरांच्या गळ्यात घालतील??, याविषयी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झाली आहे.

PM Modi took oath of office with 72 ministers, but rahul Gandhi yet not taken decision on opposition leadership

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात