सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनत मोदींची नेहरूंच्या रेकॉर्डशी बरोबरी; नड्डा, शिवराज, मनोहरलाल यांच्या मंत्रिपदी शपथविधीने भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची उत्सुकता वाढली!!

Modi equaled Nehru's record by becoming Prime Minister for the third time in a row

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय जनतेचा मोठा कौल मिळवत नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या रेकॉर्डशी बरोबरी केली. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, शिवराज सिंह चौहान आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याने आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर नेमके कोण बसणार??, याविषयीची उत्सुकता वाढली आहे. Modi equaled Nehru’s record by becoming Prime Minister for the third time in a row

शिवराज सिंह चौहान, मनोहर लाल खट्टर यांची नावे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु, भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद हा निकष असल्याने विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, शिवराज सिंह चौहान आणि मनोहरलाल खट्टर या तिन्ही नेत्यांना पंतप्रधान मोदींनी आपल्या समवेत मंत्री पदाची शपथ दिल्याने भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नेमके कोण विराजमान होणार??, याची उत्सुकता वाढली आहे.

नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात राजनाथ सिंह, अमित शाह, निर्मला सीतारामन, नितीन गडकरी, सुब्रमण्यम जयशंकर या वरिष्ठ मंत्र्यांनी शपथ घेतलीच. त्यांच्या पाठोपाठ कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, बिहारचे माजी मुख्यमंत्री जतीन राम मांझी यांनी देखील केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतली.

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृ्त्वात एनडीएचं ही सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन झालं आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत राष्ट्रपती भवन परिसरात नरेंद्र मोदी यांचा शपथविधीचा शाही सोहळा पार पडला. या सोहळ्याला देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. तसेच परदेशातील मंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहिले.

अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीत एनडीए आघाडी ही इंडिया आघाडीवर सरस ठरली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एनडीए आघाडीचं सरकार स्थापन झालं आहे. या निवडणुकीत आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पक्ष किंगमेकर ठरले आहेत. हे दोन्ही पक्ष एनडीएसोबत खमकेपणाने सोबत राहिल्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपचं नवं सरकार स्थापन झालं आहे.

महाराष्ट्रातील 6 खासदांना केंद्रीय कॅबिनेटमध्ये संधी

नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्ममधील कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील खासदारांनादेखील संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. तसेच उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले खासदार पीयूष गोयल यांनीदेखील मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. याशिवाय खासदार प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, रामदास आठवले हे देखील आज मंत्रिमंडळाची शपथ घेत आहेत.

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची नावे

  • गुजरात –

1.अमित शाह

2.एस जयशंकर

3.मनसुख मंडाविया

4.सीआर पाटिल

5.नीमू बेन बंभनिया

  • हिमाचल –

1.जे पी नड्डा

  • ओडिशा –

1.अश्विनी वैष्णव

2.धर्मेंद्र प्रधान

3.जुअल ओरम

  • कर्नाटक –

1.निर्मला सीतारमण

2.एचडीके

3.प्रहलाद जोशी

4.शोभा करंदलाजे

5.वी सोमन्ना

  • महाराष्ट्र

1.पीयूष गोयल

2.नितिन गडकरी

3.प्रतापराव जाधव

4.रक्षा खडसे

5.रामदास अठावले

6.मुरलीधर मोहोळ

  • गोवा –

1.श्रीपद नाइक

  • जम्मू-कश्मीर –

1.जितेंद्र सिंह

  • मध्य प्रदेश –

1.शिवराज सिंह चौहान

2.ज्योतिरादित्य सिंधिया

3.सावित्री ठाकुर

4.वीरेंद्र कुमार

  • उत्तर प्रदेश –

1.हरदीप सिंह पुरी

2.राजनाथ सिंह

3.जयंत चौधरी

4.जितिन प्रसाद

5.पंकज चौधरी

6.बी एल वर्मा

7.अनुप्रिया पटेल

8.कमलेश पासवान

9.एसपी सिंह बघेल

  • बिहार –

1.चिराग पासवान

2.गिरिराज सिंह

3.जीतन राम मांझी

4.रामनाथ ठाकुर

5.लल्लन सिंह

6.निर्यानंद राय

7.राज भूषण

8.सतीश दुबे

  • अरुणाचल प्रदेश –

1.किरन रिजिजू

  • राजस्थान

1.गजेंद्र सिंह शेखावत

2.अर्जुन राम मेघवाल

3.भूपेंद्र यादव

4.भागीरथ चौधरी

1.एमएल खट्टर

2.राव इंद्रजीत सिंह

3.कृष्ण पाल गुर्जर

  • केरळ

1.सुरेश गोपी

2.जॉर्ज कुरियन

  • तेलंगणा

1.जी किशन रेड्डी

2.बंदी संजय

  • तमिलनाडू

1.एल मुरुगन

  • झारखंड

1.संजय सेठ

2.अन्नपूर्णा देवी

  • छत्तीसगढ

1.तोखन साहू

  • आंध्र प्रदेश

1.डॉ.चंद्रशेखर पेम्मासानी

2.राम मोहन नायडू किंजरापु

3.श्रीनिवास वर्मा

  • पश्चिम बंगाल

1.शांतनु ठाकुर

2.सुकांत मजूमदार

  • पंजाब –

1.रवनीत सिंह बिट्टू

  • आसाम –

1.सर्बानंद सोनोवाल

2.पबित्रा मार्गेह्रिता

  • उत्तराखंड

1.अजय टम्टा

  • दिल्ली

1.हर्ष मल्होत्रा

Modi equaled Nehru’s record by becoming Prime Minister for the third time in a row

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात