विमान वाहतूक नियमन संस्थेने थकवामुळे मृत्यू झाल्याचे नाकारला
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एअर इंडियाच्या 37 वर्षीय वैमानिकास दिल्ली विमानतळावर हृदयविकाराचा झटका आला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. वैमानिकाच्या मृत्यूनंतर एव्हिएशन रेग्युलेशन बॉडी पुढे आली असून त्यांनी या घटनेवर निवेदन दिले आहे. मात्र, कामाचा थकवा आल्याने मृत्यू झाल्याची शक्यता विमान वाहतूक नियमन मंडळाने फेटाळून लावली आहे. पायलटच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे, कारण तो तंदुरुस्त घोषित करण्यात आला होता. A 37 year old Air India pilot died of a heart attack at the Delhi airport
एअर इंडियाच्या प्रवाशांसाठी अपडेट, ‘या’ देशासाठीची उड्डाणे ३० नोव्हेंबरपर्यंत असणार रद्द
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) सूत्रांनी सांगितले की, कॅप्टन हिमनील कुमार यांची 23 ऑगस्ट रोजी वैद्यकीय चाचणी झाली. यावेळी त्यांना तंदुरुस्त घोषित करण्यात आले होते. त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र ऑगस्ट २०२४ पर्यंत वैध होते. फ्लाईंग ड्युटीमुळे थकवा येण्याशी संबंधित कोणतीही समस्या नव्हती. पायलट 3 ऑक्टोबरपासून बी777 विमान उडवण्याचा कोर्स करत होते. ते पूर्वी ए३२० प्रकारची विमाने उडवत असत.
सूत्रांनी सांगितले की, ‘कॅप्टन हिमनील कुमार दिवाळीपासून रजेवर होते आणि त्यांनी गुरुवारपासूनच वर्ग सुरू केले. या वर्गात त्यांना B777 विमानही पाहायचे होते. यामुळेच ते T3 टर्मिनलवर होते. त्यांच्या मागील सर्व वैद्यकीय चाचण्या ठीक होत्या आणि दीर्घकालीन वैद्यकीय समस्या आढळून आली नव्हती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App