वृत्तसंस्था
श्रीनगर : काश्मीरमध्ये जवळपास शून्य झालेल्या दहशतवादाने जम्मूत पुन्हा डोके वर काढले आहे. या विभागात लष्करावर अतिरेकी सातत्याने हल्ले करत आहेत. ताजा हल्ला डोडा जिल्ह्यापासून ५५ किमी दूर डेसातील जंगलात धोरी गोटे भागात झाला. यात राष्ट्रीय रायफल्सच्या कॅप्टनसह ४ जवान शहीद झाले. जम्मू-काश्मीर पोलिस दलाच्या एका जवानासह ५ गंभीर जखमी आहेत.4 jawans including captain martyred in fierce encounter in Jammu; Jammu is the new base of terrorism, cowardly attacks by militants
लष्कराच्या मते, जंगलात अतिरेकी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी सायंकाळी शोधमोहीम सुरू केली होती. तेव्हा अतिरेक्यांसोबत पहिली चकमक सायंकाळी ७:३० वाजता झाली. यात जवानांच्या गोळीबारानंतर अतिरेकी जंगलात पळाले होते. रात्री ९ वाजता लष्कर शोध घेत असतानाच अतिरेक्यांनी लपून गोळीबार केला व पळाले. यात ५ जवान जखमी झाले. नंतर त्यांनी प्राण सोडले. सध्या लष्कराचे स्पेशल पॅरा कमांडोज, ड्रोन, हेलिकॉप्टर अतिरेक्यांचा शोध घेत आहेत.
डोडामध्ये ३ आठवड्यांत तिसरी चकमक आहेत. अतिरेकी संघटना जैश- ए-मोहंमदशी संबंधित काश्मीर टायगर्सने हल्ल्याची जबाबदारीउ जम्मूतील भीषण चकमकीत कॅप्टनसह ४ जवान धारातीर्थीस्वीकारली आहे. ८ जुलै रोजी कठुआतील मछेडी येथे याच संघटनेने हल्ला केला होता. यात ५ जवान शहीद झाले होते. २००५ ते २०२१ पर्यंत शांत असलेला जम्मू विभाग आता दहशतवादाचा नवा बालेकिल्ला बनला आहे. २०२१ ते आतापर्यंत लष्कर आणि पोलिस दलाच्या ५२ जवानांनी अतिरेकी हल्ल्यांमध्ये जीव गमावला आहे. तर लष्कराने ५४ अतिरेक्यांना कंठस्नान घातले आहे. मंगळवारी सायंकाळी लष्कराने सांगितले की, पुंछ जिल्ह्यातील बेतार नदीजवळ दोन अतिरेकी फिरताना दिसले. त्यानंतर त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App