RG Kar College : आरजी कार कॉलेजच्या माजी प्रिन्सिपलला थापड मारण्याचा प्रयत्न, कोर्टात हजर करताना जमावाची घोषणाबाजी

RG Kar College

वृत्तसंस्था

कोलकाता :कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना जमावातील एका व्यक्तीने थप्पड मारण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी ‘चोर-चोर’च्या घोषणा देत घोष यांना फाशी देण्याची मागणी केली. पोलीस आणि केंद्रीय दलाने परिस्थिती नियंत्रणात आणली.

ही घटना मंगळवारी घडली. जेव्हा घोष यांना अलीपूर न्यायालयात हजर राहण्यासाठी आणण्यात आले होते. आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये आर्थिक अनियमितता केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे.

न्यायालयाने घोष आणि अन्य तिघांना 8 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. त्याला 2 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाने घोष यांना निलंबित केले. यापूर्वी 28 ऑगस्ट रोजी इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) संदीप घोष यांचे सदस्यत्व रद्द केले होते.

 


आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये ८-९ ऑगस्टच्या रात्री एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या विरोधात कनिष्ठ डॉक्टरांची निदर्शने 27 दिवसांपासून सुरू आहेत. ते पोलिस आयुक्त विनीत गोयल यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणाबाबत कोलकाता येथे राजकीय पक्ष आणि डॉक्टरांचे निदर्शने सुरूच आहेत. सोमवारी (२ सप्टेंबर) कोलकाता पोलीस आयुक्त विनीत गोयल यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी करत विविध वैद्यकीय महाविद्यालयातील कनिष्ठ डॉक्टरांनी निदर्शने केली होती.

4 arrested including ex-principal of RG Kar College

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात