वृत्तसंस्था
राजौरी : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये ( Rajouri ) दहशतवाद्यांनी पोलीस दलावर गोळीबार केला आहे. येथील ठाणमंडी परिसरातील कहरोत गावात ही घटना घडली. मंगळवारी (3 सप्टेंबर) सायंकाळी 10 ते 12 गोळ्यांचा आवाज ठाणमंडीत ऐकू आला. यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला. याआधी सोमवारी सकाळी जम्मू-काश्मीरमधील सुंजवान मिलिटरी स्टेशनवर दहशतवाद्यांनी लष्करावर गोळीबार केला होता. यामध्ये एक जवान शहीद झाला.
लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, लष्करी ठाण्याच्या बाहेर लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी स्नायपर गनमधून गोळीबार केला. जवान जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. लष्कर आणि पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. ड्रोनच्या माध्यमातूनही परिसरावर नजर ठेवण्यात येत आहे.
सांबा येथे 3 पिस्तूल आणि दारूगोळा जप्त
जम्मू-काश्मीरमधील सांबा येथे सुरक्षा दलांनी 3 पिस्तूल आणि दारूगोळा जप्त केला आहे. ही शस्त्रे ड्रोनमधून टाकण्यात आल्याचे सुरक्षा दलांनी सांगितले. बीएसएफ आणि पोलिसांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. शोधमोहीमही तीव्र करण्यात आली आहे.
5 दिवसांपूर्वी कुपवाडा येथे 3 दहशतवादी मारले गेले होते
जम्मू-काश्मीरमध्ये पाच दिवसांतील हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी 29 ऑगस्ट रोजी कुपवाडा येथे झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी मारले गेले होते. यापैकी माछिलमध्ये दोन तर तंगधारमध्ये एक दहशतवादी मारला गेला. 28-29 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा खराब हवामानात माछिल आणि तंगधारमध्ये संशयास्पद हालचाली दिसून आल्याचे लष्कराने सांगितले होते. यानंतर लष्कर आणि पोलिसांनी येथे शोध सुरू केला. यादरम्यान चकमक सुरू झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App