3 केंद्रीय मंत्री, 7 खासदार मैदानात उतरविले; याला म्हणतात खऱ्या भाकऱ्या फिरवणे!!


नाशिक : मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर व्हायची आहे, पण भाजपने तिथे पहिल्या दोन टप्प्यांमध्ये एकूण 78 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या 78 उमेदवारांमध्ये 3 केंद्रीय मंत्री आणि 7 खासदारांना भाजपने विधानसभा निवडणुकीची तिकिटे देऊन मैदानात उतरविले आहे… याला म्हणतात खऱ्या भाकऱ्या फिरवणे!! 3 central ministers and 7 MPs in BJP’s first two lists in madhya Pradesh assembly elections

महाराष्ट्रात आयुष्यभर राजकारण करून 50 – 60 आमदार निवडून आणण्याची क्षमता राखणारे नेते कुठे किरकोळ फेरबदल करतात, तर मराठी माध्यमे त्याचे वर्णन “चाणक्यांनी भाकरी फिरवली”, असे करतात. पण मध्य प्रदेशात तर भाजपश्रेष्ठींनी थेट 3 केंद्रीय मंत्री आणि 7 विद्यमान खासदार पहिल्या दोन टप्प्यांमध्येच विधानसभा उतरवून खऱ्या अर्थाने भाकऱ्या फिरवल्या आहेत. याचा अर्थच भाजपश्रेष्ठी मध्य प्रदेशात आमूलाग्र फेरबदल घडविण्याच्या मूडमध्ये असल्याचे स्पष्ट होते.

मध्य प्रदेशात विधानसभेचे एकूण 230 मतदारसंघ आहेत. भाजप तिथे स्वबळावर निवडणूक लढवतो आहे आणि पहिल्या दोन टप्प्यातल्या 78 मतदारसंघांमध्येच एवढ्या मोठ्या प्रमाणावर फेरबदल करून भाजपने 3 केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, फग्गनसिंग कुलास्ते आणि प्रल्हाद सिंह पटेल यांना विधानसभा निवडणूकीची तिकिटे दिली आहेत. यापैकी नरेंद्र सिंह तोमर हे कृषी आंदोलनाच्या वेळेला केंद्रीय कृषिमंत्री राहिले. प्रल्हाद सिंह पटेल यांच्याकडे महाराष्ट्रातल्या नगर सारख्या महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी आहे, तर फग्गनसिंग कुलास्ते मध्य प्रदेशातल्या काही लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सांभाळत आहेत. पण भाजपश्रेष्ठींनी त्यांना विधानसभा निवडणुकीची तिकिटे देऊन मैदानात उतरविल्याने मध्य प्रदेशात भाजपने भाकरी फिरवल्याची चर्चा आहे.

कारण हे तिन्ही मंत्री मध्य प्रदेश राजकारणाच्या दृष्टीने हेवीवेट्स आहेत. त्यात आणखी भर म्हणून भाजपने सरचिटणीस आणि पश्चिम बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनाही विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले आहे. त्यामुळे हेवीवेट्सच्या संख्येत अधिकच भर पडली आहे.

मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांची गेली 20 वर्षे राजवट आहे. त्यामुळे “इन्कमबन्सी फॅक्टर” त्यांना सतावू शकतो, याची भाजपश्रेष्ठींना पक्की जाणीव आहे. त्यामुळे बदल घडविण्याचा पक्का फॉर्म्युला भाजपश्रेष्ठींकडे आहे, तो म्हणजे उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल!! म्हणूनच एकाच वेळी अनेक हेवीवेट्स त्यांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरवून अँटी इन्कबन्सीला धक्का द्यायचे ठरविले आहे. 3 केंद्रीय मंत्र्यांबरोबरच 7 विद्यमान खासदारांना आत्तापर्यंत भाजपने तिकिटे देणे हा विशिष्ट रणनीतीचा भाग आहे.

याचा अर्थ मध्य प्रदेश विधानसभा निवडणूकीत हे विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री विजयी झाले, तर केंद्रातही फार मोठ्या प्रमाणावर फेरबदल होतील, एक तर हे 3 केंद्रीय मंत्री मध्य प्रदेशाच्या राजकारणात सक्रिय राहतील. त्यामुळे केंद्रातली त्यांची जागा रिकामी होईल आणि तिथे नवी भरती होईल. त्याचबरोबर 7 खासदारांपैकी बहुसंख्य खासदार विजयी झाले, तर मध्य प्रदेशातून 7 नवीन खासदार तयार होतील.

शिवाय ही तर फक्त पहिल्या दोन टप्प्यांमधल्या 78 मतदारसंघांमधलीच ही राजकीय हालचाल आहे. अजून 152 मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवार जाहीर करणारे आहे. त्यामध्ये किती मोठ्या प्रमाणावर फेरबदल होतील आणि त्यात महिलांची संख्या भाजप नेमकी किती ठेवेल??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण ज्या पद्धतीने 3 केंद्रीय मंत्री आणि 7 खासदार भाजपश्रेष्ठींनी विधानसभा निवडणुकीची तिकिटे देऊन मैदानात उतरविले आहे, ते राजकीय धक्कातंत्र पाहता 152 मतदारसंघांमध्ये देखील अजून काही धक्के बसण्याइतपत बदल होतील याची चुणूक भाजपश्रेष्ठींनी दाखवली आहे.

म्हणूनच वर भाजपने खऱ्या अर्थाने भाकरी फिरविल्याचा उल्लेख केला आहे. मध्य प्रदेशात भाजपश्रेष्ठींनी आत्ता कुठे भाकऱ्या फिरवायला सुरुवात केली आहे. आता 152 मतदारसंघात उरलेल्याही भाकऱ्या फिरणार आहेत. मध्य प्रदेश काँग्रेस पुढे शिवराज सिंह चौहान यांचे नव्हे, तर या फिरलेल्या भाकऱ्यांचे आव्हान मोठे असणार आहे!!

3 central ministers and 7 MPs in BJP’s first two lists in madhya Pradesh assembly elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात