मुंबईत 263 कोटींच्या फसवणुकीचे प्रकरण, ED ने IPS अधिकाऱ्याच्या पतीचा फ्लॅट जप्त केला

वृत्तसंस्था

मुंबई : 263 कोटी रुपयांच्या आयकर रिटर्न फसवणूक प्रकरणातील आरोपी पुरुषोत्तम चव्हाण यांचा मलबार हिल्स परिसरात असलेला आलिशान फ्लॅट ईडीने जप्त केला आहे. ते मुंबईत तैनात असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याचे पती आहेत. याप्रकरणी त्यांना ईडीने या वर्षी मे महिन्यात अटक केली होती.263 crore fraud case in Mumbai, ED seizes IPS officer’s husband’s flat

या प्रकरणात पुरुषोत्तम चव्हाण यांना अटक करण्यापूर्वी, ईडीने त्यांच्या आयपीएस पत्नीच्या घराच्या झडतीदरम्यान 150 कोटी रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली होती. तपासाअंती त्यांनी अनेक बनावट कागदपत्रे तयार करून राज्य सरकारच्या योजनांतून टीडीआर देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.



150 कोटींची मालमत्ता जप्त केली

ईडीने या संपूर्ण प्रकरणाची माहिती राज्य सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांना दिली होती. झडतीदरम्यान अधिकाऱ्यांनी सांगितले होते की त्यांना मुंबई आणि ठाण्यातील सुमारे 14 फ्लॅटची कागदपत्रे सापडली आहेत. यातील दोन मोठे फ्लॅट वरळीत होते. याशिवाय मुंबई आणि पुण्याची टीडीआर कागदपत्रेही एजन्सीच्या पथकाने जप्त केली आहेत. सापडलेल्या मालमत्तेची किंमत 150 कोटी रुपये असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जप्त केलेली टीडीआर कागदपत्रेही बनावट निघाली

मालमत्तेची कागदपत्रे वेगवेगळ्या लोकांच्या नावावर होती, परंतु संबंधित लोकांच्या नावावर ही बेनामी मालमत्ता निर्माण केली असावी असा संशय आहे. जप्त केलेली टीडीआर कागदपत्रेही बनावट असल्याचे सूत्रांनी सांगितले. संभाव्य खरेदीदारांची फसवणूक करण्यासाठी याचा वापर करण्यात आल्याचा संशय आहे.

पुरुषोत्तम चव्हाण यांना 20 मे रोजी अटक

पुरुषोत्तम चव्हाण यांना पीएमएलए अंतर्गत आयकर परतावा फसवणुकीच्या प्रकरणात 20 मे रोजी अटक करण्यात आली होती. यापूर्वी या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्यांमध्ये तानाजी मंडल अधिकारी, भूषण पाटील आणि राजेश शेट्टी हे न्यायालयीन कोठडीत असून राजेश ब्रिजलाल बत्रेजा हे ईडीच्या कोठडीत आहेत.

263 crore fraud case in Mumbai, ED seizes IPS officer’s husband’s flat

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात