सकाळच्या सर्वेत पवारांच्या पक्षाला सहानुभूती, पण तिसरी नंबरवारी; टक्केवारीत भाजपच सर्वांना भारी!!

In the sakaal survey, sympathy for Pawar party, but the third number In terms of percentage, BJP is overwhelming

विशेष प्रतिनिधी

पुणे : सकाळ आणि साम टीव्हीने घेतलेल्या सर्वेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारांची सहानुभूती मिळाली आहे. पण मतदान टक्केवारीत भाजपच इतर सगळ्यांपेक्षा भारी ठरल्याचे आकडेवारी दाखवत आहे. पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सहानुभूती मिळाली असली तरी क्रमवारीत पक्षाला तिसऱ्या नंबरवर थांबावे लागले आहे.
In the sakaal survey, sympathy for Pawar party, but the third number In terms of percentage, BJP is overwhelming

सकाळ आणि साम टीव्हीने महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघांमधल्या एकूण 84529 मतदारांचा रँडम सर्वे केला. यात 68 % पुरुष, तर 31 % महिलांचा समावेश होता. या सर्वेच्या निष्कर्षात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर मतांच्या टक्केवारीत मात केलेली दाखवली आहे, तर सुप्रिया सुळे अजितदादांना भारी ठरल्याचे दाखविले आहे.



महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपला सर्वाधिक पसंती दिली असून भाजपला 28.5 %, त्या खालोखाल काँग्रेसला 24 %,
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 14 %, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 11.7 %, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 6 %, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला 4.2 % पसंती दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत जरी ठाकरे यांच्या शिवसेनेला पवारांच्या राष्ट्रवादी पेक्षा जास्त मते मिळाली असली, तरी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सकाळ आणि साम टीव्हीने केलेल्या सर्वेत मात्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा जास्त टक्केवारी मिळाल्याचे दिसत आहे.

मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सुप्रिया सुळे या अजितदादांवर भारी ठरल्याचे टक्केवारी दाखवत आहे. अर्थात या शर्यतीत देखील देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हेच इतर सगळ्यांपेक्षा भारी ठरले आहेत. त्यांना प्रत्येकी 22.4 % अशी समान टक्केवारीत मतदारांनी पसंती दिल्याचे दाखवले आहे. मुख्यमंत्री पदासाठी सुप्रिया सुळे 6.8 % मते घेऊन अजितदादांवर भारी ठरल्याचे दाखविले असून अजितदादांना 5.3 % मतदारांनी पसंती दिल्याचे दाखवले आहे.

In the sakaal survey, sympathy for Pawar party, but the third number In terms of percentage, BJP is overwhelming

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात