68 हजार वीज कर्मचाऱ्यांना 19% पगारवाढ; वेतनवाढीमुळे 1500 कोटींचा बोजा, उपमुख्यमंत्र्यासह संघटनांच्या वाटाघाटी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या कंपन्यांतील 68 हजार कर्मचारी, अभियंते, अधिकारी व सहायक प्रवर्गातील कामगारांना मूळ वेतनात 19% वाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला. रविवारी (7 जुलै) उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबईत विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यात हा निर्णय झाला. वेतनवाढीवर 1570.47 कोटी रुपये खर्च होतील. पगारवाढीचा करार 1 एप्रिल 2023 पासून प्रलंबित होता. एप्रिलमध्ये झालेल्या बैठकीत फडणवीसांनी वीज कर्मचाऱ्यांना मूळ वेतनामध्ये 15 व भत्त्यांत 100% वाढीचा प्रस्ताव दिला होता. त्यासाठी कंपन्यांवर 1435 कोटींचा आर्थिक भार येईल असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, कामगार संघटनांनी तो प्रस्ताव फेटाळला. त्यानंतर 19% वाढीचा निर्णय झाला.19% salary increase for 68 thousand electricity employees; 1500 crore burden due to wage hike, union negotiations with Deputy Chief Minister



अशी असेल पगारवाढ

1. कर्मचारी, अभियंते व अधिकाऱ्यांच्या मूळ वेतनात १९ टक्के, सर्व भत्त्यांत २५ टक्के.
2. तीन वर्षांच्या कंत्राटावर नियुक्त सहायक कर्मचाऱ्यांना ५००० रुपये.
3. लाइनवर काम करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना अतिरिक्त १००० रुपये.

19% salary increase for 68 thousand electricity employees; 1500 crore burden due to wage hike, union negotiations with Deputy Chief Minister

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात