वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रीय गुप्तचर विभागात अधिकारी पदासाठी १५० जागा आहेत. त्यासाठी भरती होणार असून ७ मे पर्यंत अर्ज करण्याची इच्छुकांना मुदत आहे. 150 posts for Assistant Central Intelligence Officer; Deadline for applicants is May 7
इंटेलिजन्स ब्युरो (IB) १६ एप्रिल रोजी १५० असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (ACID) पदांच्या भरतीसाठी अधिकृतपणे जाहिरात प्रसिद्ध केली. ग्रेड- २/तांत्रिक अंतर्गत ACIO च्या पदांवर ब्युरोद्वारे भरती केली जाणार आहे. यामध्ये ५६ पदे संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानासाठी आणि उर्वरित ९४ पदे इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन शाखेसाठी आहेत.
इंटेलिजेंस ब्युरोच्या ग्रेड- २ / तांत्रिक विभागातील सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही तांत्रिक शिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये BE/B.Tech पदवी उत्तीर्ण केलेली असावी. इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा संगणकासह मास्टर डिग्री पास असणे आवश्यक आहे. गेट उत्तीर्ण उमेदवार अर्जास पात्र आहेत.
७ मे २०२२ रोजी उमेदवारांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि २७ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
अर्जादरम्यान, उमेदवारांना १०० रुपये शुल्क देखील भरावे लागेल, जे ऑनलाइन माध्यमातून भरता येईल. तथापि, उमेदवार एसबीआय चालानद्वारे अर्ज शुल्क देखील भरण्यास सक्षम असतील.
अर्ज करणारे उमेदवार केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट mha.gov.in वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतील. याव्यतिरिक्त, उमेदवार भारत सरकारच्या ncs.gov.in या राष्ट्रीय करिअर सेवा पोर्टलवर देखील अर्ज करू शकतील. अर्ज प्रक्रिया १६ एप्रिल पासून सुरू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App