ऑस्ट्रेलियात नाेकरीच्या अमिषाने सहा लाखांची फसवणुक


ऑस्ट्रेलियात चांगल्या पगाराची नाेकरी लावून देताे असे अमिष दाखवून बनावट व्हिसा देऊन तीनजणांची प्रत्येकी दाेन-दाेन लाख रुपये घेऊन एकूण सहा लाखांची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.


प्रतिनिधी

पुणे – ऑस्ट्रेलियात चांगल्या पगाराची नाेकरी लावून देताे असे अमिष दाखवून बनावट व्हिसा देऊन तीनजणांची प्रत्येकी दाेन-दाेन लाख रुपये घेऊन एकूण सहा लाखांची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी काेथरुड पाेलीस ठाण्यात डाॅ.स्नेहा जाेगळेकर व वरुण जाेगळेकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Kothroud Agency Offer good salary job in Australia and cheated three youths for six lakh rupees

यासंर्दभात पाेलीसांकडे ३६ वर्षीय तरुणानेा तक्रार दाखल केली आहे. डाॅ.स्नेहा जाेगळेकर आणि वरुण जाेगळेकर यांची जे.एस.सी.ओव्हरसीज कन्सलटंट नावाची कंपनी असून तिचे कार्यालय काेथरुड येथे आहे. तक्रारदार हा दुबईत यापूर्वी काम करत हाेता आणि सन २०१८ मध्ये त्याची नाेकरी सुटल्यानंतर ताे भारतात परतला हाेता व नवीन नाेकरीच्या शाेधात हाेता.



जाेगळेकर यांनी त्यास ऑस्ट्रेलियात नाेकरी लावून देताे असे अमिष दाखवले. त्याकरिता त्यास ऑस्ट्रेलियात मॅरीटाईम क्रु हा खाेटा व्हिसा देऊन त्याचासह इतरांचा विश्वास संपादन केला. त्याकरिता प्रत्येकाकडून दाेन लाख रुपये आराेपीने स्विकारले. परंतु त्यांना नाेकरीस न लावता त्यांची फसवणुक करण्यात आली.

नाेकरी न मिळाल्याने संबंधित तक्रारदार हे जाेगळेकर यांच्याकडे पैसे मागण्यासाठी गेले असता त्यांना खाेटया गुन्हयात अडकवेल अशी धमकी देऊन आराेपी गुंतवणुकदारांना भेटण्यास टाळाटाळ करु लागला. अखेर तक्रारदार तरुण, त्याचा भाऊ व एक मित्र अशा तिघांनी काेथरुड पाेलीस ठाणे गाठत आराेपीं विराेधात पाेलीसांकडे तक्रार अर्ज दाखल केला. याबाबत पुढील तपास काेथरुड पाेलीस करत अआहे.

Kothroud Agency Offer good salary job in Australia and cheated three youths for six lakh rupees

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात