गुजरातमधील गीर सोमनाथमध्ये काल रात्री सतत पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे 13 ते 15 बोटी समुद्रात बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. या बोटीत अनेक मच्छीमारही होते. मिळालेल्या माहितीनुसार, बोटीतील 8 ते 10 मच्छीमार अजूनही बेपत्ता आहेत. कालपासून बिघडलेले हवामान पाहता हवामान खात्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला होता.15 boats sunk due to storm, 8 to 10 Fishermen Missing in Gujarat Gir Somnath sea
वृत्तसंस्था
अहमदाबाद : गुजरातमधील गीर सोमनाथमध्ये काल रात्री सतत पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे 13 ते 15 बोटी समुद्रात बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. या बोटीत अनेक मच्छीमारही होते. मिळालेल्या माहितीनुसार, बोटीतील 8 ते 10 मच्छीमार अजूनही बेपत्ता आहेत. कालपासून बिघडलेले हवामान पाहता हवामान खात्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला होता.
महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी भागात कालपासून सतत पाऊस पडत आहे आणि IMD नुसार येत्या ४८ तासांत येथे मुसळधार पाऊस पडू शकतो. यासोबतच मच्छीमारांसाठी ५ दिवसांचा इशाराही देण्यात आला आहे. त्याचवेळी ओडिशा आणि आंध्रवर ‘जवाद’ चक्रीवादळाचे सावट आहे. अहमदाबादमध्ये आयएमडीच्या प्रादेशिक संचालक मनोरमा मोहंती म्हणाल्या की, गुजरातमध्ये 30 नोव्हेंबरपासून पाऊस सुरू होईल. यासोबतच 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत उत्तर आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीवर मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या राज्यांमध्ये पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाने सांगितले की, 1 ते 2 डिसेंबरदरम्यान पंजाब, हरियाणा, चंदिगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशात कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता आहे. त्याच वेळी, आज 2 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मेघगर्जना/विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. याशिवाय अंदमान आणि निकोबार बेटांवर मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App